Ramesh Baraskar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Solapur News : ‘आम्ही लग्नाळू...’ म्हणत तरुणांचा कलेक्टर कचेरीवर मोर्चा नेणाऱ्या बारसकरांची नवी अफलातून घोषणा...

Madha Lok Sabha Constituency : रमेश बारसकर यांनी डिसेंबर 2022 मध्ये आम्ही लग्नाळू म्हणत लग्न न झालेल्या तरुणांचा सोलापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. त्या मोर्चात मुंडावळ्या घालून लग्न न झालेले तरुण घोड्यावर बसून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाने आले होते.

Vijaykumar Dudhale

Solapur, 1 April : निवडणुका आल्या की राजकीय पक्षांकडून विविध घोषणांचा पाऊस पाडला जातो. आम्ही पाणी देऊ...तरुणांच्या हाताला काम देऊ...महागाई कमी करू....शेतीमालाला हमीभाव देऊ...अशा राजकीय जुमलेबाजींना ऊत येतो. अनेकदा मतदारांना वास्तव परिस्थितीपासून दूर नेत नको त्या विषयात गुंतवले जाते. मात्र, माढ्यातील ‘वंचित’चे उमेदवार रमेश बारसकर यांनी मतदारसंघातील तरुणांची लग्नं करणं, हेच आपलं उद्दिष्ट असणार आहे, अशी अफलातून घोषणा केली आहे, त्यांच्या या घोषणेची सोलापूरमध्ये एकच चर्चा रंगली आहे.

वंचित बहुजन आघाडीकडून माढा लोकसभा मतदारसंघासाठी (Madha Lok Sabha Constituency) मोहोळचे माजी नगराध्यक्ष रमेश बारसकर यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. बारसकर हे मोहोळ नगरपरिषदेचे पहिले नगराध्यक्ष आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर त्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला होता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, रमेश बारसकर (Ramesh Baraskar) यांनी डिसेंबर 2022 मध्ये आम्ही लग्नाळू म्हणत लग्न न झालेल्या तरुणांचा सोलापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. त्या मोर्चात मुंडावळ्या घालून लग्न न झालेले तरुण घोड्यावर बसून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाने आले होते. 'कोणी मुलगी देता का मुलगी लग्नासाठी या पामराला,' असे फलक घेऊन ते तरुण जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले होते. या मोर्चाच्या माध्यमातून बारसकर यांनी एका सामाजिक मुद्द्याला हात घातला होता. आताही त्यांनी पुन्हा लग्न न झालेल्या तरुणांची लग्नं करणं, हेच आपले पहिले उद्दिष्ट असेल असे जाहीर केले आहे.

वंचितकडून लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ते आज पंढरपुरात विठ्ठलाच्या दर्शनासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना एका वेगळ्या मुद्द्याला हात घातला आहे.

माढा लोकसभा मतदारसंघासह राज्यभरातील तरुणांची वेळेवर लग्न होत नाहीत. आजही ही मोठी समस्या आहे. 30 ते 35 वर्षे उलटून गेल्यानंतरही तरुणांची लग्नं होतं नाहीत. त्यांच्या लग्नाची ही समस्या सोडविण्यासाठी आपण प्राधान्याने काम करणार आहे, अशी अफलातून घोषणा बारसकर यांनी केली आहे. त्यांच्या या घोषणेची सर्वत्र चर्चा सुरू आहे.‌

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT