Tanaji Sawant News  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Tanaji Sawant News : मंत्री तानाजी सांवत आमदारांचा निधी वापरून 'ट्रान्सफार्मर बँक' उभी करणार...

सरकारनांमा ब्यूरो

शितल वाघमारे -

Bhum Paranda News : वीज पुरवठा आणि वाहतूकीत महत्त्वाचे ठरणारे ट्रान्सफॉर्मर बिघाड झाल्यानंतर त्याची तातडीने दुरुस्ती होत नाही. यामुळे शेतकऱ्यांची मोठी अडचण होते. हीच बाब टाळण्यासाठी आता शिलकीत ट्रान्सफॉर्मर राहतील, असे नियोजन करण्यात येणार आहे. प्रत्येक मतदारसंघात ट्रान्सफॉर्मर बँक तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती, राज्याचे आरोग्यमंत्री आणि पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी दिली. (Latest Marathi News)

राज्यातील शेतकऱ्यांना सातत्याने भेडसावत असलेली समस्या म्हणजे सतत विजेचा खंडित होत असलेला प्रवाहाचा आहे. कारण शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी वीज अत्यावश्यक आहे. राज्यातील शेतकऱ्यांना अखंडित वीजप्रवाह उपलब्ध करून द्यावा लागतो. शेतकऱ्यांना आपली पिके जगणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी पाण्याचा साठा करणे किंवा उपसा करणे यासाठी विजेची मोठ्या प्रमाणात आवश्यक असते. परंतु, अनेक वेळा ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त असतो. नागरिक व शेतकऱ्यांच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात व्यत्यय येतो. तसेच पिकांचेही नुकसान होते.

ट्रान्सफॉर्मर दुरस्तीसाठी महावितरणच्या कार्यालयात अनेक चकरा मारल्यानंतर महिने दोन-दोन महिने त्याची दुरुस्ती च होत नसल्याने शेतकऱ्याचा हंगाम निघून जातो.हंगामातच ट्रान्सफॉर्मर जळत असल्याकारणाने शेतकऱ्यांना ओलितासाठी वीज मिळत नाही. अनेक शेतकऱ्यांना ह्याचा मनस्ताप सहन करून आर्थिक फटक्यालाही समोरे जावे लागते. ओलिताच्या हंगामात विजेची खरी गरज असताना त्यावेळेस वीज उपलब्ध होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागतो.

जिल्ह्यातील प्रत्येक आमदार यांना आपल्या आमदार निधीतून ट्रान्सफॉर्मर विकत घ्यावयाचा आहे. तो ट्रान्सफार्मर त्या आमदाराच्या मतदार संघात वापरायचा आहे. हे ट्रान्सफार्मर महावितरणच्या जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या ताब्यात असणार आहे. ज्या ठिकाणी ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त झाला अथवा जळाला तर त्या ठिकाणी 30 मिनिटाच्या आत नवीन ट्रान्सफॉर्मर बसविण्यात येणार आहे. नादुरुस्त झालेला ट्रान्सफार्मर आठ दिवसाच्या आत दुरुस्त करून ट्रान्सफार्मर बँकेत जमा करण्यात येणार आहे.

आरोग्य मंत्री सांवत यांनी त्यांच्या भूम- परंडा वाशी या मतदारसंघात ट्रान्सफॉर्मर बँक तयार करण्यात आल्याची माहिती दिली आहे. त्यासाठी वैयक्तिक संस्थेचा कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सबलिटी (सीएसआर) 1 कोटी रुपयांचा निधी दिला आहे. स्वतः च्या आमदार निधीतून 1 कोटी रुपये निधी देणार असल्याचे त्यांनी सांगितलं.

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT