Ram Satpute-Praniti shinde
Ram Satpute-Praniti shinde Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

MNS-NCP Bet : सोलापुरातील विजयाची मनसे पदाधिकारी हरला पैज; शरद पवार गटाला दिला लाखाचा धनादेश

Vijaykumar Dudhale

Solapur, 06 June : सोलापूर लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे राम सातपुते निवडून येतील, असा दावा करून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रशांत इंगळे यांनी एक लाखाची पैज लावली होती. मात्र, सोलापूरमधून प्रणिती शिंदे निवडून आल्याने ते एक लाखाची पैज हरले असून त्यांनी शरद पवार गटाचे पदाधिकारी प्रशांत बाबर यांना एक लाख रुपयांचा धनादेश दिला आहे.

सोलापूरमधून (Solapur) भाजपचे राम सातपुते 70 ते 80 हजार मतांनी निवडून येतील. जय श्रीराम म्हणत सोलापूरच्या हलगीच्या कडकडाटात राम सातपुते (Ram Satpute) संसदेत पोचतील, असाही दावा प्रशांत इंगळे यांनी केला होता. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रशांत बाबर यांनी प्रणिती शिंदे (Praniti Shinde) निवडून येतील, असा दावा केला होता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

महाविकास आघाडीच्या नेत्याचा त्यांच्या अजेंड्यावर विश्वास असला तरी आमचाही नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे यांच्यावर विश्वास आहे. मी एक लाख रुपयाची पैज लावतो, असेल हिम्मत तर प्रशांत बाबर यांनी तो पैजेचा विडा उचलावा, असे आवाहन त्यांनी प्रशांत बाबर यांना दिले होते.

मनसेच्या प्रशांत इंगळेंनी दिलेले आव्हान शरद पवार गटाचे प्रशांत बाबर यांना स्वीकारले होते. चार जून रोजी झालेल्या मतमोजणीत काँग्रेसच्या प्रणिती शिंदे ह्या ७४ हजार ८१४ मतांनी निवडून आल्या आहेत. त्यामुळे मनसेचे प्रशांत इंगळे हे पैज हरले आहेत. पैज हरल्यानंतर इंगळे यांनी प्रामाणिकपणे प्रशांत बाबर यांना एक लाखाचा धनादेश दिला.

सोलापूर लोकसभा मतदारसंघातील सहा पैकी चार विधानसभा मतदारसंघात प्रणिती शिंदे यांना मताधिक्क्य मिळाले आहे. त्यात पंढरपूर-मंगळेवढा, मोहोळ, सोलापूर शहर मध्य आणि दक्षिण सोलापूर या मतदासंघातून मताधिक्य मिळाले आहे. भाजपचे राम सातपुते यांना मात्र सोलापूर शहर उत्तर आणि अक्कलकोट या दोन मतदारसंघातून मताधिक्य मिळाले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT