Jaykumar Gore Vs Abu Azmi  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Nagpur Winter Session : पुसेसावळीतील हिंसाचारावरुन आमदार अबू आझमी अन् गोरे यांच्यात जुंपली

Jaykumar Gore Vs Abu Azmi : " छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल चुकीच्या पोस्ट कशा येतात..."

Vishal Patil

Satara News : साताऱ्यातील पुसेसावळी येथे काही दिवसांपूर्वी दोन गटात दंगल झाली होती. या दंगलीत नूरहसन शिकलगार या 27 वर्षीय युवकाची हत्या झाली होती. यावर अधिवेशनात प्रश्न उपस्थित करताना अबू आझमी सरकार नपुसंक असल्याचे म्हणताच भाजपचे खटाव- माण मतदार संघाचे आमदार जयकुमार गोरे यांनी जोरदार आक्षेप घेत छ. शिवाजी महाराज यांच्यावर चुकीची वक्तव्यं,स्टेटस या राज्यात चालणार नाही, असे म्हणत. रेकाॅर्डवरून अबू आझमीचे म्हणणे काढण्याची विनंती केली.  

अबू आझमी म्हणाले, पुसेसावळी येथे दोन मुलांची एका मुलीशी दोस्ती होती. त्यामध्ये एक मुस्लिम आणि एक मुलगा मुस्लिम नव्हता. मुस्लिम मुलाचा दुसऱ्या मुलाने इन्स्टाग्राम हॅक केले. त्यानंतर त्याने छ. शिवाजी महाराज यांच्याविषयी एक आपत्तीजनक पोस्ट टाकली. यामध्ये पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत मुस्लिम मुलाची यामध्ये काहीही चूक नसल्याचे सांगितले, सभागृहात त्यांनी सांगितले. (Jaykumar Gore)

यावर आमदार जयकुमार गोरे यांनी आक्षेप घेत अबू आझमी चुकीची माहिती देत असल्याचे सांगितले. ते म्हणाले, पुसेसावळीत घडलेली घटना दुर्देंवी आहे, मात्र, पोलिसांचे चार्जशीट अजून दाखल झाले नसताना आपण सभागृहाला चुकीची माहिती देवू नये. तसेच सध्य परिस्थितीत सर्वकाही शांत असताना, काहीतरी घडू नये, याची काळजी घ्यावी. 

अबू आझमी (Abu Azmi) म्हणाले, हजारो लोक एकत्र येवून इंजिनिअर युवकाची हत्या झाली असून त्यामध्ये कोणालाही अटक झाली नाही. यावर आमदार गोरे म्हणाले, पोलिसांनी तातडीने 150 लोकांवर गुन्हे दाखल झाले असून 34 लोकांना अटक झाली. ज्या पोस्ट आल्या त्या वाचल्या तर अंगावर शहरे आणणाऱ्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल चुकीच्या पोस्ट कशा येतात, हे पाहणे गरजेचे आहे. कायदा- सुव्यवस्था धोक्यात येईपर्यंत टिपू सुलतानाचे स्टेटस ठेवून छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर चुकीची वक्तव्ये करणे, स्टेटस ठेवणे या राज्यात चालणार नाही. 

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पुसेसावळीतील 11 सप्टेंबरला रात्रीची घटना

साताऱ्यातील खटाव तालुक्यातील पुसेसावळी (Pusesavali ) येथे महापुरूषांच्यावर आक्षेपार्ह पोस्ट केल्यामुळे 11 सप्टेंबर रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास दोन गटात दंगल झाली. यामध्ये एका मुस्लिम युवकाची हत्या झाली. तसेच 10 जण जखमी झाले होते. दगडफेकीत 6 दुचाकी आणि एका चारचाकी नुकसान झाले होते, तर अनेक घरांचे आणि दुकानाचेही नुकसान झाले होते. त्यानंतर सातारा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी दाखल होत कर्फ्यू जाहीर केला होता.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT