Narendra Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Narendra Patil News : शशिकांत शिंदेंच्या पराभवासाठी नरेंद्र पाटील सरसावले, म्हणाले...

Umesh Bambare-Patil

Satara Loksabha News : मागील लोकसभा निवडणुकीत उदयनराजे भोसले यांच्या विरोधात निवडणूक लढलो होतो. या पंचवार्षिक निवडणुकीत कदाचित मी उदयनराजे भोसले यांच्या प्रचारात व्यासपीठावर दिसणार नाही. मात्र, पक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाचे काम करणार असल्याची भूमिका माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत जाहीर केली.

दरम्यान, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोटाळ्याचा आरोप झालेल्या शशिकांत शिंदे यांना योग्य वेळेला कारवाईला सामोरे जावे लागणार असल्याचे सूचक वक्तव्यही त्यांनी केले.

नरेंद्र पाटील(Narendra Patil) म्हणाले, ‘मागील लोकसभेला माझ्यासारख्या 'माथाडी'च्या नेत्याला शशिकांत शिंदे यांनी विरोध केला होता. कार्यकर्त्यांची चुकीच्या पद्धतीने अडवणूक करून माझ्याविरोधात प्रचार केला होता. त्यामुळे माझा गतवेळेच्या लोकसभा निवडणुकीत पराभव झाला होता. या लोकसभा निवडणुकीत शशिकांत शिंदे यांच्या पराभवासाठी पूर्ण ताकद लावणार असून, उदयनराजे यांना मोठ्या फरकाने निवडून आणणार आहे.'.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, 'मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील बाळासाहेब सोळसकर, शशिकांत शिंदे(Shashikant Shinde) यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. तरीदेखील पणन महामंडळ त्यांच्यावर कारवाई करत नाही. शशिकांत शिंदे अनेक ठिकाणी घोटाळा झाला नसल्याचे सांगत आहेत. ते एवढे स्वच्छ आहेत तर पुरावे घेऊन चौकशीला सामोरे जावे. त्यामुळे शशिकांत शिंदे यांच्यावर घोटाळ्याचे आरोप झाल्याने त्यांनी आत्मपरीक्षण करून निवडणुकीतून अर्ज माघार घ्यावा,' असेही पाटील यांनी सांगितले. या वेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, विकास गोसावी, विठ्ठल बलशेट्टवार उपस्थित होते.

कागदपत्रे न बघता वक्तव्य -

मागील काही दिवसांपूर्वी शशिकांत शिंदे यांचा शौचालयाच्या घोटाळ्यात सहभाग नसल्याचे वक्तव्य केले होते. त्यानंतर मी संबंधित प्रकरणाची कागदपत्रे तपासली असता, अनेक सत्य बाबी लक्षात आल्या. यामध्ये शशिकांत शिंदे यांनी अनेक चुकीची कामे केल्याची आढळून आले. त्यामुळे या प्रकरणातील टप्प्याटप्प्याने माहिती लोकांसमोर आणणार असल्याचे नरेंद्र पाटील यांनी सांगितले.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT