Sharad Pawar, Chandrakant Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sharad Pawar : म्हणून 'तो' निर्णय घेतला..! शरद पवारांनी सांगितले चंद्रकांत पाटलांच्या पुस्तकातील प्रश्नाचे उत्तर...

Amol Sutar

Sharad Pawar : भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यांनी लिहिलेल्या पुस्तकात राष्ट्रवादीचे खासदार शरद पवार यांनी दहा वर्षे कृषीमंत्री होते, त्यांनी साखर कारखानदारांसाठी काय केले ? असा उल्लेख केला आहे. त्यावर आज सांगोल्यात दिवंगत गणपतराव देशमुख यांच्या स्मरनार्थ आयोजित कृषी महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी त्यांच्या पुस्तकातील प्रश्नाचे उत्तर पवार यांनी दिले.

यावेळी बळीराजा जगला पाहिजे, हेच आमच्यासाठी महत्वाचे असल्याचे शरद पवार यांनी सांगितले. आज सोलापुरातील सांगोला येथे दिवंगत शेकापचे आमदार गणपतराव देशमुख यांच्या स्मरनार्थ आयोजित कृषी महोत्सवाच्या गणेशरत्न राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन 2024 चे उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी सरकारचे शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष नसल्याचा आरोप सरकारवर केला.

भारत हा साखर उत्पादनात दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. मात्र साखर कारखानदारी जपताना बळीराजा जगला पाहिजे, असे त्यांनी सांगितले. यावरुन पवार यांनी भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी लिहिलेल्या एका पुस्तकात शरद पवार यांनी दहा वर्षे कृषीमंत्री होते, त्यांनी साखर कारखानदारांसाठी काय केले ? असा सवाल उपस्थित केला होता. त्यावर पवार यांनी आज स्पष्टीकरण दिले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

ते म्हणाले, 'काल मी एक पुस्तक वाचत होतो. ते पुस्तक महाराष्ट्राचे एक मंत्री भाजपचे चंद्रकांत पाटील यांनी लिहिलेलं. ते भाजपचे एकेकाळी अध्यक्ष होते. त्यांच्या पुस्तकात त्यांनी लिहिलं आहे की, मोदी सरकारने शंभर साखर कारखान्यावर एक्साईज ड्युटी बसली होती. ती माफ करण्याबाबतचा निकाल नरेंद्र मोदी यांनी घेतली. शरद पवार दहा वर्षे कृषी खात्याचे मंत्री होते.

त्यांना हा निर्णय घेता आला नाही, तो आम्ही घेतला. यावर शरद पवार म्हणाले, ही खरी गोष्ट आहे. कारण माझ्या पुढे प्रश्न होता सबंध हिंदुस्थानाचा. लहान शेतकरी आणि त्याच्या डोक्यावरील कर्ज वाचवायचे, का शंभर कारखान्यांमध्ये एक्साईज ड्युटी वाढली ती कमी करायची. साखर कारखानदारी महत्वाची आहे. त्यांचे प्रश्न सोडविले पाहिजेत. पण शंभर कारखान्यांची ड्युटी 11 हजार कोटी होती.

ती माफ करायची हे काम महत्वाचे आहे की आम्ही निर्णय घेतला देशातील थकबाकीदार शेतकरी आहे त्याच्या डोक्यावरच कर्ज माफ करायचं. आम्ही ठरवलं शेतकऱ्यांच्या डोक्यावरच कर्ज माफ करण महत्वाच आहे. म्हणून 71 हजार कोटी रुपयांचे सबंध देशातील शेतकऱ्यांच्या डोक्यावरील कर्ज हे माफ केले. कारखान्याची ड्युटी माफ करण्याच्याबाबतीत नंतर निर्णय घेता येतील पण पहिल्यांदा बळीराजा जगला पाहिजे', म्हणून आम्ही तो निर्णय घेतला असल्याचं स्पष्टीकरण शरद पवार यांनी दिले.

ते पुढे म्हणाले, आज शेतकरी आत्महत्या करतोय. मी कृषी खात्याचा मंत्री असताना कांद्याच्या किंमती वाढल्यामुळे माझ्या विरोधात घोषणा दिल्या. शेतकऱ्यांचे नुकसान होवू देणार नाही, अशी भूमिका मी त्यावेळी घेतली. सध्याच्या सरकारला कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांबद्दलची आस्था राहिली नाही. शेतकऱ्यांना सवलती द्या, असे पवार यांनी सांगितले.

पंतप्रधान मोदी माझावर टीका करत आहेत. प्रत्येक सभेत मी काय केले असे सांगितले जाते. आता ते सोलापूर दौऱ्यावर येणार आहेत. तेव्हाही माझ्यावर टीका करतील. लोकांशी आमची बांधिलकी आहे. सांगोला राजकीय दृष्ट्या जागृक आहे. देशाच्या अनेक भागात सांगोल्याचे लोक व्यवसायाच्या निमित्ताने आहेत. दुष्काळ असतानाही चांगलं डाळिंब येथे पिकते. ते देशाच्या कानाकोपऱ्यात विकले जाते.

येथील शेतकरी एकवेळ उपाशी राहील पण लाचारी करणार नाही. तो स्वाभिमानी आहे, कष्टाने येथील लोकांनी बदल घडवला आहे. दरम्यान, दिवंगत गणपतराव देशमुख यांची परंपरा त्यांच्या वारसांनी कायम पुढे सुरू ठेवावी. तुमची एकी कायम राहू द्या, एकत्र काम करा मी आणि माझ्या पक्षाचे जयंत पाटील नेहमी तुमच्या सोबत आहोत, असा शब्द यावेळी शरद पवार यांनी दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT