Solapur, 26 May (प्रकाश सनपूरकर ) : नीट पेपरफुटी प्रकरणी अटकेत असलेला प्रा. शिवराज मोटेगावकर याच्यावरील कारवाईची पडसाद सर्वत्र उमटताना दिसत आहेत. सोलापूर शहरात मोटेगावकर याच्या नावाने सुरू असलेली खासगी शिक्षण संस्थेतील क्लासेसची ब्रॅंच तडकाफडकी बंद करण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
दरम्यान, जुळे सोलापुरातील (Solapur) एका नामांकित संस्थेत प्रा. शिवराज मोटेगावकर याच्या क्लासची शाखा सुरू होती, त्यामुळे संबंधित संस्था चालकाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र तो होऊ शकला नाही.
नीट पेपरफुटी प्रकरणात शिवराज मोटेगावकर (Shivraj Motegaonkar ) हा मुख्य सूत्रधाराच्या भूमिकेत असल्याचे पुढे येत आहे. पेपर सेट करण्याच्या प्रक्रियेत ‘आरसीसी’मध्ये काम करणारा पी. व्ही. कुलकर्णी याला पहिल्यांदा सेट केले, त्याचा फायदा मोटेगावकरला पेटर फुटीप्रकरणी झाल्याची चर्चा आहे.
सीबीआयच्या माध्यमातून नीट पेपरफुटीची तपास करण्यात येत आहे. चौकशीत विविध धागेदोरे समोर येत आहेत. या पेपरफुटी प्रकरणी आतापर्यंत ११ जणांना अटक करण्यात आली आहे, त्यात महाराष्ट्रातील सात जणांचा समावेश आहे. यात प्रा. शिवराज मोटेगावकर, पी. व्ही. कुलकर्णी, मनीषा पांढरे, मनीषा हवालदार, मनीषा वाघमारे, शुभम खैरनार, धनंजय लोखंडे यांचा त्यात समावेश आहे.
सीबीआयने आतापर्यंत काही विद्यार्थ्यांचीही चौकशी केली आहे, त्यामुळे नीट पेपरफुटी प्रकरणाची चौकशीची व्याप्ती वाढली आहे. तपास यंत्रणांनी अनेकांची याबाबत चौकशी केली आहे, त्यामुळे दिवसेंदिवस या प्रकरणाचे धागेदोरे वाढत चाललेले आहेत.
या चौकशीच्या पार्श्वभूमीवर मोटेगावकर याच्या शैक्षणिक उपक्रमांवरही परिणाम दिसून येत आहे. सोलापुरातील एका खासगी शिक्षण संस्थेमार्फत मागील काही वर्षांपासून मोटेगावकर क्लासेसची शाखा चालवली जात होती. वैद्यकीय प्रवेश परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये या क्लासला मोठी पसंती होती. मात्र, मोटेगावकर याच्यावर कारवाई होताच संबंधित क्लासेसची पाटी हटवून ब्रॅंच बंद करण्यात आली आहे.
500 हून अधिक विद्यार्थी गावी परतले
सोलापूर जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी बारावी आणि नीटच्या तयारीसाठी लातूरमध्ये वास्तव्यास होते. बहुतांश विद्यार्थी त्या ठिकाणी खोल्या घेऊन शिक्षण घेत होते. मात्र, नीट पेपरफुटीचे प्रकरण पुढे आल्यानंतर हे विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर आपापल्या गावी परतले आहेत. अशा विद्यार्थ्यांची संख्या ५०० हून अधिक असल्याचे सांगितले जात आहे. या घडामोडींमुळे नीटच्या तयारीचे नियोजन विस्कळित झाले असून, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.