Latur NEET scam : "जिथे स्कॅम तिथे काँग्रेस; मोटेगावकर त्यांचाच कार्यकर्ता, प्रत्येक निवडणुकीत...", भाजप आमदाराचा गंभीर आरोप

NEET paper leak controversy : 'आमचा मोटेगावकर याच्याशी काहीही संबंध नाही, मुळात हा राजकारणाचा विषय नाही. तो काँग्रेसचा असो की भाजपाचा यापेक्षा त्याच्यामुळे 22 लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे. त्याला कदापी सोडता कामा नये. सीबीआयच्या तपासात आणखी बऱ्याच गोष्टी बाहेर येणार आहेत.'
Shivraj Motegaonkar, Abhimanyu Pawar
Shivraj Motegaonkar, Abhimanyu PawarSarkarnama
Published on
Updated on

Latur News, 21 May : 'नीट' पेपरफुटी प्रकरणात लातूर कनेक्शन उघड झाले आणि एकच खळबळ उडाली. शिवराज मोटेगावकर या खाजगी संस्था चालकाला सीबीआयने अटक केल्यानंतर लातूरमधील राजकारण चांगलेच तापले आहे. भाजप आणि काँग्रेसच्या नेत्यांमध्ये यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. आमदार अभिमन्यू पवार यांनी मोटेगावकर हे काँग्रेसचेच कार्यकर्ते आहेत, जिथे स्कॅम तिथे काँग्रेस असा थेट हल्ला चढवला.

पेपरफुटीच्या प्रकरणात लातूर कनेक्शन उघड झाल्यापासून काँग्रेसचे खासदार डॉ. शिवाजी काळगे, भाजपाचे आमदार अभिमन्यू पवार यांच्यात सोशल मिडियावर वॉर सुरू आहे. त्यातच आज मुंबईत एका वृत्तवाहिनीशी बोलताना पवार यांनी शिवराज मोटेगावकर हा काँग्रेसचा कार्यकर्ता आहे, त्याने लोकसभा, विधानसभा, महापालिका, जिल्हा परिषद, नगरपालिकेत त्या पक्षाचा प्रचार केला आहे. त्यामुळे तो कोणाचा आहे हे स्पष्ट असल्याचे सांगत काँग्रेसकडे बोट दाखवले.

आमचा मोटेगावकर याच्याशी काहीही संबंध नाही, मुळात हा राजकारणाचा विषय नाही. तो काँग्रेसचा असो की भाजपाचा यापेक्षा त्याच्यामुळे 22 लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे. त्याला कदापी सोडता कामा नये. सीबीआयच्या तपासात आणखी बऱ्याच गोष्टी बाहेर येणार आहेत. या प्रकारामुळे लातूर पॅटर्नला मात्र निश्चितच धक्का बसला आहे.

पण हा डाग आम्ही पुसून काढू, लातूर पॅटर्न उभा करण्यात अनेकांची मेहनत आहे. एखाद्याच्या चुकीमुळे हा पॅटर्न संपणार नाही. शिक्षणाचा लातूर पॅटर्न आम्ही पुन्हा उभा करू. लातूरमध्ये राज्यभरातून शिक्षणासाठी विद्यार्थी येतात, त्यांचा विश्वास लातूर पॅटर्नवर कायम राहील, यासाठी आम्ही सगळेच प्रयत्न करणार आहोत. विद्यार्थ्यांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहनही अभिमन्यू पवार यांनी केले.

Shivraj Motegaonkar, Abhimanyu Pawar
Maharashtra Politics Live Update : नीट पेपरफुटी प्रकरणी डॉ. शिरुरेला सीबीआयकडून अटक

फीस साठी एसओपी हवी...

वैद्यकीय शिक्षणासाठीच्या नीट परीक्षेसाठी खाजगी क्लासेसकडून प्रचंड फीस आकारली जाते. यातून विद्यार्थी, पालकांची अक्षरशः लूट केली जाते. याला चाप बसवण्याची गरज आहे असे मत व्यक्त करतांनाच या संस्थाचालकांनी विद्यार्थ्यांकडून किती फीस घ्यावी, याला नियम असावेत, त्यासाठी एसओपी तयार करण्याची नितांत गरज असून त्यासाठी आपण पाठपुरावा करणार असल्याचे अभिमन्यू पवार यांनी सांगीतले.

Shivraj Motegaonkar, Abhimanyu Pawar
Ramgiri Maharaj on sand mining : गोदावरीतील वाळूचा एक कणही उचलू देणार नाही! महिलांचा एल्गार, रामगिरी महाराजही मैदानात

मोटेगावकर याच्या क्लासमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी घाबरून जाऊ नये, त्यांना इतर ठिकाणी प्रवेश देण्यासाठीही मी प्रयत्न करणार आहे. या पेपरफुटी प्रकरणानंतर एकाही विद्यार्थ्याचे नुकसान होऊ नये यासाठी मी स्वतः लक्ष घालून विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचेही अभिमन्यू पवार म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com