Udayanraje Bhosale Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satara Political News : उदयनराजेंचे कुठं कुठं मन लागत नाही, याची खासगीत माहिती द्या...

Sharad Pawar साताऱ्यात राजेंच्या भाजपवरील नाराजीवरून शरद पवारांचा टोला

Umesh Bambare-Patil

Satara Political News : उदयनराजेंचे कुठं कुठं मन लागत नाही, याची मला एकदा खासगीत माहिती द्या, असे शरद पवारांनी सांगत उदयनराजे यांना चिमटा काढला. सातारा शासकीय विश्रामगृहात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. तसेच पाच राज्यांतील निकालावर जपून भाष्य केले. या वेळी उदयनराजे यांच्यावरील प्रश्नावर त्यांनी मिश्कीलपणे उत्तर दिले.

सातारा Satara लोकसभेसाठी भाजप, अजित पवार गट राष्ट्रवादी आणि शिवसेना ही उमेदवार उभा करणार आहेत. त्यामुळे खासदार उदयनराजे Udayanraje भोसले यांची गोची होणार आहे. त्यामुळे त्यांना तुम्ही राष्ट्रवादीत घेणार का ? या प्रश्नावर शरद पवार म्हणाले, इतर पक्षांनी कोणाला उभे करायचे हा त्यांचा प्रश्न आहे. आम्ही आमचा उमेदवार उभा करणार असून, कोणाला बरोबर घेऊन उमेदवार उभा करणार आणि निवडून कसा आणायचा हाच पेच आमच्या पुढे आहे.

बाकीच्यात आम्ही लक्ष घालत नाही. खासदार उदयनराजे भोसले हे सध्या भाजपवर नाराज असून, त्यांचे मन लागत नाही, त्यामुळे आगामी लोकसभेसाठी त्यांना राष्ट्रवादीत घेणार का, असा आमचा प्रश्न होता असे पवार यांना संगण्यात आल्यावर या प्रश्नावर खासदार शरद पवार Sharad Pawar यांनी मिश्कीलपणे उत्तर दिले. पवार म्हणाले, त्यांचे कुठं कुठं मन लागत नाही याची खासगीत माहिती मला द्या, असे शरद पवार म्हणताच एकच हशा पिकला.

सातारा लोकसभेवर अजित पवार यांनी दावा सांगितला होता. त्यांच्या विरोधात तुम्ही उमेदवार देणार का यावर खा. शरद पवार म्हणाले, याबाबत आमची चर्चा अजून झालीच नाही आणि दुसऱ्या पक्षाचं मी काय सांगणार, असे म्हणत घूमजाव केले.

Edited By : Amol Sutar

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT