Satara Political News : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सातारा लोकसभेत उमेदवार देण्याची घोषणा केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव आक्रमक झाले असून, त्यांनी सातारा लोकसभेवर शिवसेनेचाच हक्क आहे, असा दावा केला आहे. त्यामुळे शिंदे गट शिवसेना व राष्ट्रवादीत संघर्ष पेटण्याची चिन्हे आहेत.
सातारा लोकसभा Satara loksabha मतदारसंघात भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या तीन पक्षांनी आपला खासदार निवडून आणण्यासाठी तयारी सुरू केली आहे. राष्ट्रवादी शरद पवार Sharad Pawar गट व अजित पवार Ajit pawar गट यांच्याकडे इच्छुक उमेदवारही आहेत. भाजपनेही जोरदार तयारी केली असली तरी त्यांचा उमेदवार कोण हा प्रश्न गुलदस्त्यात आहे.
या सर्व परिस्थितीत कर्जत येथील राष्ट्रवादीच्या मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीसह पाच लोकसभा मतदारसंघांत उमेदवार देणार असल्याचे जाहीर केले आहे. मुळात या पाच मतदारसंघांत राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे खासदार आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीच्या दोन गटांचे उमेदवार एकमेकांना भिडण्याची शक्यता आहे.
तर सातारा लोकसभा मतदारसंघात यापूर्वी शिवसेनेने उमेदवार दिला होता, पण आता या मतदारसंघात भारतीय जनता पक्षाने पूर्ण ताकदीने उतरण्याचा निर्णय घेतला आहे. याच दरम्यान शिंदे गट शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव यांनी मध्यंतरी पत्रकार परिषदेत सातारा लोकसभेवर शिवसेनेचाच हक्क आहे.
आणि हा मतदारसंघ आम्ही युतीच्या जागावाटपात आमच्याकडे घेण्याची आग्रही मागणी करणार आहे, असे स्पष्ट केले होते. त्यानंतर अजित पवारांनी काल केलेल्या घोषणेमुळे सातारा लोकसभा मतदारसंघावरून शिवसेना व राष्ट्रवादीत संघर्ष पेटण्याची चिन्हे आहेत.
Edited By : Amol Sutar
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.