Prakash Ambedkar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसला ठेवले गॅसवर; म्हणाले, ‘...तोपर्यंत आम्ही काँग्रेससोबत बसणार नाही’

Congress Alliance Issue : नगरपालिका निवडणुकांतील पराभवानंतर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसवर तीव्र टीका करत भविष्यात मोठा राजकीय फटका बसण्याचा इशारा दिला आहे.

विश्वभूषण लिमये
  1. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसवर जोरदार टीका करत, नगरपालिकांमध्ये काँग्रेसचा जनाधार संपल्याचा दावा केला आहे.

  2. भाजपसोबत कोणत्याही परिस्थितीत संबंध ठेवणार नसल्याचे स्पष्ट करत, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये परिस्थितीनुसार युती होत असल्याचे त्यांनी सांगितले.

  3. भाजप-आरएसएसवर एकाधिकारशाहीचा आरोप करत, ईव्हीएममध्ये १० टक्के गैरव्यवहार झाल्याचा गंभीर दावा आंबेडकरांनी केला आहे.

Solapur, 25 December : काँग्रेस पक्षाला लक्षात आलेलं नाही की, नगरपालिका निवडणुकीत त्यांच्या सोबत आता हिंदू राहिलेला नाही. नगर परिषद निवडणुकीत त्यांचं पानिपत झालेलं आहे. काँग्रेसच ओरबडण्याचं धोरण थांबत नाही, तोपर्यंत आम्ही त्यांच्यासोबत बसणार नाही. मी ज्या दिवशी तोंड उघडेन, तर काँग्रेसला महाराष्ट्र नव्हे; तर देशभर फटका बसेल. मात्र त्याचा भाजपला फायदा होतो, त्यामुळे सर्व गुलदस्त्यात आहे, असा गौप्यस्फोट वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केला.

ॲड प्रकाश आंबेडकर हे सोलापूर (Solapur) दौऱ्यावर आले होते. त्या वेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी काँग्रेससोबत आघाडी करण्याबाबत भाष्य केले आहे. ते म्हणाले, मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षासोबत जायचे की नाही, याबाबत आम्ही आणखी भूमिका घेतलेली नाही.

ॲड प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar ) म्हणाले, गरजेपोटी युत्या आणि आघाडी होत आहेत आणि त्या युत्यांचा आम्हीही एक भाग आहोत. भाजपसोबत आम्ही कुठलाही संबंध ठेवणार नाही, फक्त भाजप सोडून इतरांशी आम्ही बोलतोय. एका जिल्ह्यामध्येच एक पक्ष हा एका भागात आहे आणि दुसऱ्या भागात नाही. महाराष्ट्र पातळीवर कुठल्या एका पक्षाशी राजकीय युती नाही. महापालिका स्थरावर आमच्या युत्या होत आहेत

सेक्युलर फोर्सेसबाबत आम्ही कॅटलिस्ट होत चाललो आहोत. लोकल बॉडीमध्ये युतीचे राजकारण आपण सोडून दिले पाहिजे. संघटना वाढवण्याच्या दृष्टिकोनातून सर्व कार्यकर्त्यांना मताच्या रूपाने बळ मिळते आणि पक्षाचे अस्तित्वही अवलंबून राहते. संघटनेपेक्षा सत्ता ही महत्वाची असं ब्रीदवाक्य झालेलं आहे, ते आगामी काळासाठी धोकादायक आहे. राजकीय संघटन आणि राजकीय पक्ष वीक झाले तर इथली परिस्थिती सांभाळणार कोण? त्यामुळे सत्तेबरोबर संघटनसुद्धा महत्वाचे आहे, असे आंबेडकर यांनी नमूद केले.

वंचितचे अध्यक्ष आंबेडकर म्हणाले, भाजपने 2014 पासून युतीचं राजकारण केलं, त्या युतीच्या राजकारणात सध्याच्या परिस्थितीत सिलेक्टिव्ह युती करायची असं धोरण ठरवलं आहे. काही ठिकाणी अजित पवारांना जवळ करून युती करायची आणि एकनाथ शिंदे यांना बाजूला सारायचं. जिथे एकनाथ शिंदेंना घेतलं तिथं अजित पवारांना बाजूला सारायचं, असे भाजपचे धोरण आहे.

बिहार निवडणुकीच्या अनुषंगाने विरोधी पक्षाला तर त्यांना संपवायचेच आहे, त्यासोबतच आपल्यासोबत असणाऱ्या मित्रपक्षांनाही संपवायचा खेळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपने सुरु केलेला आहे. लोकशाहीच्या नावाखाली सिंगल पार्टी रुल आणणयाचा प्रयत्न केला जात आहे. भाजपने धर्माच्या नावाखाली लोकशाहीला हुकूमशाहीकडे परावर्तीत करायला सुरुवात केली आहे. माझी आणि माझ्या अगोदरच्या पिढीने हुकूमशाही काय असते, हे अनुभवली आहे, त्याची झलक सध्या दिसत आहे, अशी भीती आंबेडकरांनी बोलून दाखवली.

...तर मी ईव्हीएमधील गैरव्यवहार सिद्ध करून दाखवेन

प्रकाश आंबेडकर, ईव्हीएममध्ये 10% मॅन्युपिलेशन केलेलं आहे. माझ्यासोबत एक राजकीय पार्टी जॉईन झाली तर मी ते सिद्ध करून दाखवेन. माझी ईव्हीएमविरोधातील याचिका कोर्टाने फेटाळली. याबाबत आम्ही पिटीशन दाखल करणार आहोत. सोलापूरच्या writerning ऑफिसरने कोर्टासमोर इव्हिडिन्स दिला आहे, इंजिनिअर काय करतो, याची आम्हाला माहिती नाही. जे writerning ऑफिसर IT चे नाहीत, त्यांची अवस्था आहे. आणि जे IT चे ऑफिसर आहेत तर writerning ऑफिसर होत नाहीत.

प्र.1: प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेससोबत युतीबाबत काय भूमिका मांडली?
उ: काँग्रेसचे “ओरबडण्याचे धोरण” थांबेपर्यंत त्यांच्यासोबत बसणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

प्र.2: वंचित बहुजन आघाडी भाजपसोबत युती करणार आहे का?
उ: नाही, भाजपसोबत कोणताही संबंध ठेवणार नसल्याचे आंबेडकरांनी ठामपणे सांगितले.

प्र.3: भाजपच्या युती धोरणावर आंबेडकरांचे मत काय आहे?
उ: भाजप सिलेक्टिव्ह युती करून मित्रपक्षांनाही कमकुवत करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

प्र.4: ईव्हीएमबाबत प्रकाश आंबेडकरांचा दावा काय आहे?
उ: ईव्हीएममध्ये १०% मॅन्युपिलेशन झाले असून ते सिद्ध करण्याचे आव्हान त्यांनी दिले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT