Siddharam Mhetre  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Solapur News : माजी आमदार म्हेत्रेंसह गोकुळ शिंदेंना दणका; ‘मातोश्री’च्या थकीत कर्जापोटी युनियन बॅंकेकडून मालमत्ता जप्तीची कारवाई

Matoshree sugar factory Loan Issue : मातोश्री शुगर कारखाना हा अक्कलकोट तालुक्यातील रुद्देवाडी येथे आहे. या कारखान्याच्या उभारणीसाठी युनियन बॅंक ऑफ इंडियाकडून एप्रिल २०११ मध्ये २० कोटी ३० लाख रुपयांचे टर्म लोन घेतले होते. बॅंकेच्या कर्जाचे हप्ते आणि व्याज याची कारखान्याकडून वेळेवर परतफेड झाली नाही.

सरकारनामा ब्यूरो

Solapur, 05 May : अक्कलकोटचे काँग्रेसचे माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे पुन्हा एकदा अडचणी आले आहेत. मातोश्री शुगर कारखान्यासाठी उचलण्यात आलेल्या थकीत कर्जाच्या वसुलीसाठी युनियन बॅंक ऑफ इंडियाने मालमत्ता जप्तीची कारवाई केली आहे. माजी आमदार म्हेत्रे यांच्यासह त्यांचे भागीदार गोकुळ शिंदे, दत्तात्रेय शिंदे आणि कुटुंबातील १३ जणांच्या नावावर असलेली मालमत्ता बॅंकेने जप्ती केली असून या मालमत्तेचा लिलाव ३० दिवसांत लिलाव करण्याची जाहीर नोटिसही बॅंकेकडून करण्यात आली आहे.

दरम्यान, मातोश्री शुगर कारखान्याचे प्रमुख माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे (Siddharam Mhetre ) यांनी बॅंकेकडून करण्यात आलेल्या कारवाईचा स्पष्ट शब्दांत इन्कार केला आहे. युनियन बॅंक ऑफ इंडियाकडून आमच्या कोणत्याही मालमत्तेची जप्ती करण्यात आलेली नाही. मालमत्ता जप्तीची किंवा जाहीर लिलावाची आम्हाला नोटीस आलेली नाही, असे म्हेत्रे यांनी स्पष्ट केले आहे.

मातोश्री शुगर कारखाना हा अक्कलकोट (Akkalkot) तालुक्यातील रुद्देवाडी येथे आहे. या कारखान्याच्या उभारणीसाठी युनियन बॅंक ऑफ इंडियाकडून एप्रिल २०११ मध्ये २० कोटी ३० लाख रुपयांचे टर्म लोन घेतले होते. त्यासाठी मातेाश्री शुगर कारखान्याची मालमत्ता, माजी आमदार म्हेत्रे, गोकुळ शिंदे, दत्तात्रेय शिंदे आणि कुटुंबातील १३ जणांच्या नावावर असलेली मालमत्ता तारण ठेवण्यात आली होती.

बॅंकेच्या कर्जाचे हप्ते आणि व्याज याची कारखान्याकडून वेळेवर परतफेड झाली नाही, त्यामुळे युनियन बॅंकेकडून कर्जवसुलीसाठी कायदेशीर प्रक्रिया ही २००९ पासून सुरू केली होती. या प्रक्रियेनुसार बॅंकेने सहा वर्षांनंतर म्हणजे ०२ एप्रिल २०२५ पासून मातोश्री शुगरसह १३ जणांच्या मालमत्तेचा ताबा घेण्यात आल्याचे बॅंकेकडून जाहीर करण्यात आले आहे.

जप्तीच्या कारवाईनंतर संबंधितांनी ३० दिवसांत पैसे न भरल्यास मालमत्तेचा लिलाव करण्याची जाहीर नोटीस युनियन बॅंकेकडून देण्यात आली आहे. पैसे न भरल्यास मालमत्तेच्या लिलाव अटळ असल्याचे युनियन बॅंक ऑफ इंडियाकडून सांगण्यात आले आहे.

दरम्यान, युनियन बॅंकेकडून आम्हाला कोणतीही नोटीस असलेली नाही. जप्तीची कोणतीही कारवाई बॅंकेनेही केलेली नाही, असा दावा माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांनी केला आहे. जप्तीच्या कारवाईमध्ये मातोश्री कारखान्याची मालमत्ता, माजी आमदार म्हेत्रे यांचे सुपुत्र शिवराज म्हेत्रे यांची पुणे, सोलापूरमधील मालमत्ता, तसेच शिंदे कुटुंबीयांच्या सोलापूरमधील मालमत्तांचा समावेश आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT