Satara Politic's : जयकुमार गोरेंच्या बदनामीचं प्रकरण रामराजेंनीच शिजवलं अन्‌ वाढवलं; भाजपच्या बड्या नेत्याचा खळबळजनक दावा

jaykumar Gore Defamation Case : व्हायरल झालेल्या ‘त्या’ ऑडिओ क्लिपमध्ये संबंधित महिला ही रामराजे नाईक निंबाळकर यांना उद्देशून तुम्ही एकमेव माझा आधार आहात, असे म्हणत आहे. त्यावरून सत्य काय आहे, ते कळते.
Ranjitsinh Naik Nimbalkar-Ramraje Naik Nimbalkar- jaykumar gore
Ranjitsinh Naik Nimbalkar-Ramraje Naik Nimbalkar- jaykumar goreSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 05 May : ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या बदनामीचं प्रकरण कोणी शिजवलं? कोणी वाढवलं? आणि गोरे यांचे मंत्रिपद काढण्यासाठी कोणी कट केला? हे व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपनंतर वेगळे सांगायची गरज नाही. यामागे रामराजेच आहेत, असं तर ती महिलाच संभाषणातून सांगते. गोरेंच्या बदनामी प्रकरणाच्या मागे रामराजेंशिवाय दुसरं कोणी असूच शकत नाही, असा घाणाघात माढ्याचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर केला आहे.

रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar) आणि संबंधित महिलेच्या संभाषणाची एक ऑडिओ क्लिप दोन दिवसांपूर्वी व्हायरल झाली आहे. तत्पूर्वी दोन मे रोजी निंबाळकरांना वडूज पोलिसांनी चौकशीसाठी समन्स बजावले होते, त्यामुळे गोरे यांच्या बदनामी प्रकरणात काही दिवसांपासून रामराजे यांचे नाव आल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

सोलापूर (Solapur) जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले माजी खासदार निंबाळकर यांनी माध्यमाशी बोलताना या प्रकरणामागे रामराजे नाईक निंबाळकर हेच आहेत, असा स्पष्ट आरोप केला आहे. ते म्हणाले, व्हायरल झालेल्या ‘त्या’ ऑडिओ क्लिपमध्ये संबंधित महिला ही रामराजे नाईक निंबाळकर यांना उद्देशून तुम्ही एकमेव माझा आधार आहात, असे म्हणत आहे. त्यावरून सत्य काय आहे, ते कळते.

Ranjitsinh Naik Nimbalkar-Ramraje Naik Nimbalkar- jaykumar gore
Mangalvedha Politics : परिचारक समर्थकाने आवताडेंच्या कार्यकर्त्यांना पुन्हा अस्मान दाखवले; प्रतिष्ठेच्या निवडणुकीत मारली बाजी

जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांच्या बदनामीचे प्रकरण कोणी शिजवलं? कोणी वाढवलं? आणि गोरे यांचे मंत्रिपद काढण्यासाठी कोणी कट केला? हे वेगळे सांगायची गरज नाही. त्यामुळे गोरे यांच्या बदनामी प्रकरणामागे रामराजेंशिवाय दुसरं कोणी असूच शकत नाही, असा दावाही रणजितसिंह निंबाळकरांनी केला.

जयकुमार गोरे यांची मुलगी आज 20 ते 22 वर्षांची आहे. अशा प्रकरणात प्रतिमा डागळल्यानंतर माणूस कुटुंबात जाण्यासही धजावत नाही. पण, गोरे हे निष्कलंक असल्याने ते जिद्दीने उभे राहिले. पोलिसांनी या प्रकरणाचा चांगला तपास केला. तसेच, न्यायालयाने गोरे निरापराध आहेत, असा निकालही दिलेला आहे. हे एक राजकीय षडयंत्र होते, ते मोडण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी चांगलं काम केलं आहे. गोरे या प्रकरणातून निष्कलंक होऊन बाहेर पडले आहेत, असा दावाही निंबाळकरांनी केला आहे.

Ranjitsinh Naik Nimbalkar-Ramraje Naik Nimbalkar- jaykumar gore
Shambhuraj Desai : शिंदेंच्या मंत्र्यांना अजितदादांची धास्ती; शंभूराज देसाईंनी पर्यटन महोत्सवात बोलून दाखवली, ‘अजितदादा आज हवे होते, पण आम्ही मकरंदआबांना घेऊन त्यांच्याकडे जाऊ’

‘कोण मोहिते?’

माजी खासदार निंबाळकर म्हणाले, जयकुमार गोरे यांची पालकमंत्रिपदी झालेली निवड ही मोहिते पाटलांना शह देण्यासाठी आहे का, या प्रश्नावर रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी ‘कोण मोहिते?’ असा प्रतिसवाल केला. मोहिते पाटलांशी तुलना करण्यात आम्हाला आज इंटरेस्ट नाही. गोरे यांच्याकडे सोलापूरच्या पालकमंत्रिपदासोबत ग्रामविकास मंत्रिपदही दिलेले आहे. सोलापूरच्या विकासासाठी गोरेंची नियुक्ती फडणवीसांनी केली आहे. कोणाला टार्गेट करण्यासाठी कोणाची नियुक्ती होत नसते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com