Mangalvedha Politics : परिचारक समर्थकाने आवताडेंच्या कार्यकर्त्यांना पुन्हा अस्मान दाखवले; प्रतिष्ठेच्या निवडणुकीत मारली बाजी

Talsangi Society elections : शिवानंद पाटील यांनी आमदार समाधान आवताडेंच्या ताब्यातील दामाजी कारखाना हिसकावून घेतला होता. त्याचा राग आवताडे समर्थकांना होता, त्यातूनच या सोसायटीची निवडणूक लागल्याचे सांगितले जाते.
Prashant Paricharak-Samadhan Autade
Prashant Paricharak-Samadhan AutadeSarkarnama
Published on
Updated on

Mangalvedha, 04 May : पंढरपूर मतदारसंघाचे भाजपचे आमदार समाधान आवताडे आणि माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या समर्थकांमध्ये अजूनही समेट झालेला दिसत नाही. स्थानिक पातळीवर हे दोन्ही गट एकमेकांना आव्हान देताना दिसून येत आहेत. सुमारे अडीच वर्षांपूर्वी परिचारक समर्थकांनी आमदार आवताडे यांची दामाजी सहकारी साखर कारखान्यावरील सत्ता उलथवून टाकली होती. त्याची पुनरावृत्ती आज मंगळवेढा तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्वपूर्ण असलेल्या श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष शिवानंद पाटील यांच्या तळसंगी गावातील सोसायटीच्या निवडणुकीत झाली आहे. परिचारक समर्थकांनी पुन्हा एकदा आवताडे समर्थकांना धूळ चारली आहे.

तळसंगी हे शिवानंद पाटील यांचे गाव आहे. येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी ही मंगळवेढा तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्वपूर्ण सोसायटी समजली जाते. शिवानंद पाटील यांनी आमदार समाधान आवताडेंच्या (Samadhan Autade) ताब्यातील दामाजी कारखाना हिसकावून घेतला होता. त्याचा राग आवताडे समर्थकांना होता, त्यातूनच या सोसायटीची निवडणूक लागल्याचे सांगितले जाते.

एरवी मंगळवेढा (Mangalvedha) तालुक्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका ह्या सामंजस्याच्या भूमिकेतून बिनविरोध केल्या जातात. सहकाराच्या राजकारणातील तो एक अलिखित शिरस्ता मानला जातो. मात्र तळसंगी सोसायटीच्या निवडणुकीत बिनविरोधसाठी समेट न झाल्याने सोसायटीची निवडणूक लागली होती.

आमदार समाधान आवताडे आणि माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या समर्थकांनी तळसंगी सोसायटीची निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. सोसायटी ताब्यात घेण्यासाठी दोन्ही गटाकडून जोरदार प्रयत्न झाले होते. त्यातून चुरशीने मतदान झाले होते. किरकोळ बाचाबाची वगळता मतदान शांतेत झाले होते. एकूण 866 मतदारांपैकी 739 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता.

Prashant Paricharak-Samadhan Autade
Shambhuraj Desai : शिंदेंच्या मंत्र्यांना अजितदादांची धास्ती; शंभूराज देसाईंनी पर्यटन महोत्सवात बोलून दाखवली, ‘अजितदादा आज हवे होते, पण आम्ही मकरंदआबांना घेऊन त्यांच्याकडे जाऊ’

या निवडणुकीत श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष शिवानंद पाटील यांच्या गटाचा विजय झाला. त्यांनी आमदार समाधान आवताडे समर्थकांना पुन्हा एकदा धूळ चारली. परिचारक समर्थक शिवानंद पाटील यांच्या नेतृत्वाखालीच दामाजी कारखान्याची निवडणूक अडीच वर्षांपूर्वी लढवली हेाती. त्याही निवडणुकीत आवताडे यांच्यासह समर्थकांचा पराभव केला हेाता, त्यामुळे परिचारक समर्थकांनी पुन्हा एकदा आवताडे समर्थकांना धूळ चारली आहे.

Prashant Paricharak-Samadhan Autade
Ajit Pawar On Sanjay Shirsat : संजय शिरसाटांच्या आदळाआपटवर अजितदादांचे सूचक विधान; म्हणाले, ‘...तर राज्याचे मुख्यमंत्री विचार करतील’

दामाजी साखर कारखान्याच्या निवडणुकीत सभासदांनी विश्वास ठेवून आम्हाला संधी दिली होती. संचालक मंडळाने त्या विश्वासाला पात्र राहण्याची भूमिका निभावली आहे. गावातील राजकीय वर्चस्वाला शह देण्यासाठी विरोधकांनी निवडणुक लादली. पण, सभासदांनी मतदानातून विरोधकांना योग्य उत्तर दिले आहे, असे दामाजी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष शिवानंद पाटील यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com