Solapur, 20 October : महाविकास आघाडीला आज धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण, शेतकरी कामगार पक्ष आज महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची शक्यता आहे. आघाडीतून बाहेर पडून शेकाप आज आठ जागांवर आपले उमेदवार जाहीर करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.
सांगोल्यातून (Sangola) माजी आमदार दीपक साळुंखे यांच्या हाती उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधून मशाल हाती दिली आहे. दीपक साळुंखे यांच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रवेशाच्या कार्यक्रमात ठाकरे यांनी साळुंखे यांच्या उमेदवारीचे संकेत दिले आहेत, त्यामुळे महाविकास आघाडीतील शेतकरी कामगार पक्ष (PWP) नाराज झाला आहे.
महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) आम्हाला सन्मानपूर्वक जागा न दिल्यास आम्ही वेगळा विचार करणार असे शेतकरी कामगार पक्षाच्या एका युवा नेत्याने म्हटले होते. आम्ही प्रागतिक विचारांच्या पक्षांना सोबत घेऊन विधानसभेची निवडणूक लढवू, असेही त्यांनी स्पष्ट केले होते. मात्र, सांगोल्याची जागा शेतकारी कामगार पक्षाला न सुटल्यास आम्ही स्वतंत्रपणे निवडणूक लढविणार असल्याचेही त्यांनी सांंगितले हेाते.
महाविकास आघाडीत सन्मानपूर्वक जागा मिळत नसल्याचे लक्षात आल्याने शेतकरी कामगार पक्षाने स्वतंत्र निवडणूक लढविण्याचा निर्धार केला आहे. त्यानुसार आज शेकाप आठ जागांवर स्वतंत्र उमेदवार जाहीर करणार असल्याची माहिती आहे. शेकापने स्वतंत्र उमेदवार जाहीर केल्यास महाविकास आघाडीला धक्का बसण्याची शक्यता आहे.
मुंबईत आज पक्षाची बैठक होणार आहे. या बैठकीनंतर संध्याकाळी उमेदवारांच्या नावांची घोषणा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सांगोल्याच्या शेकापच्या जागेवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने दावा केल्याने पक्ष स्वतंत्र निवडणूक लढविण्याचा निर्णय घेण्याची शक्यता आहे.
शेतकरी कामगार सांगोला, कंधार, उरण, पनवेल आलिबाग यांसह आठ जागांवर पक्षाचे स्वतंत्र उमेदवार जाहीर करणार असल्याची माहिती अधिकृत सूत्रांकडून देण्यात आली आहे, त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शेकाप बाहेर पडणे महाविकास आघाडीला परवडणारे नाही, त्यामुळे महाविकास आघाडीचे नेते यावर काय तोडगा काढतात, हे पाहावे लागणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.