Chhagan Bhujbal, Radhakrishna Vikhe Patil sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Karad Political News : छगन भुजबळांनी मुक्ताफळे उधळणे थांबवावे : राधाकृष्ण विखे-पाटील

Radhakrishna Vikhe Patil कोल्हापूरहून साताऱ्याकडे रवाना होण्यापूर्वी मंत्री विखे-पाटील कऱ्हाडला काहीकाळ थांबले होते. त्यादरम्यान त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

Umesh Bambare-Patil

-हेमंत पवार

Radhakrishna Vikhe Patil News : छगन भुजबळ हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी मराठा समाजाविरोधात वक्तव्य करणे हे दुर्दैवी आहे. मराठा समाज आऱक्षण मागतोय तो त्यांचा अधिकार आहे म्हणून मागतोय. सरकार त्याच्यावर सकारात्मक विचार करत आहे. मुख्यमंत्री, उपमख्यमंत्र्यांनी कोणाच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही असे स्पष्ट केले आहे. मात्र, तरीही विनाकारण भुजबळांकडून राईचा पर्वत करण्याचे काम सुरू आहे. त्यांनी मुक्तफळे उधळणे थांबवले पाहिजे, असा इशारा महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आज मंत्री छगन भुजबळ यांना दिला.

कोल्हापूरहून साताऱ्याकडे रवाना होण्यापूर्वी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील RadhaKrishna Vikhe Patil कऱ्हाडला काहीकाळ थांबले होते. त्यादरम्यान त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, मराठा आऱक्षण देण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी Eknath Shinde दोन जानेवारीपर्यंत मुदत मागितली आहे. सरकारचे हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. सरकार मराठा आऱक्षणाबाबत गंभीर आहे.

त्यामुळे कोणाच्या मनात शंका असण्याची कारण नाही. जरांगे-पाटील यांनाही तसे आश्वासन सरकारने लिखित स्वरूपात दिले आहे. टिकणारे आरक्षण देण्याची भूमिका आहे. मंत्रिमंडळात चर्चा होऊन स्वतंत्र अधिवेशन बोलवायचे की काय, याबाबत चर्चा सुरू आहे.

ते म्हणाले, छगन भुजबळ हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी अशा प्रकारचे वक्तव्य करणे हे दुर्दैवी गोष्ट आहे. मराठा समाज आऱक्षण मागतोय तो त्यांचा अधिकार आहे म्हणून मागत आहे. सरकार त्याच्यावर सकारात्मक विचार करत आहे. Maharashtra Political News

मुख्यमंत्री, उपमख्यमंत्र्यांनी कोणाच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही असे स्पष्ट केले आहे. विनाकारण भुजबळांकडून राईचा पर्वत करण्याचे काम सुरू आहे. त्यांनी आता मुक्ताफळे उधळणे थांबवले पाहिजे. मात्र, त्यांच्या वक्तव्यातून जातीय दंगली घडतील, असे वाटत नाही.

Edited by : Umesh Bambare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT