Solapur BJP Agitation Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Solapur BJP : ‘उपराष्ट्रपतींची मिमिक्री करणारे खासदार अन राहुल गांधींवर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करा’

Solapur BJP Agitation : हा केवळ उपराष्ट्रपतींचा नव्हे; तर संपूर्ण देश आणि संसदेचा अपमान आहे.

Vijaykumar Dudhale

Solapur News : उपराष्ट्रपतिपद हे संविधानिक पद आहे, त्यामुळे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची मिमिक्री करणारे खासदार आणि त्यांना साथ देणारे राहुल गांधी यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी माजी खासदार तथा सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे समन्वयक अमर साबळे यांनी सोलापुरात केली. (Rahul Gandhi and TMC MPs protest from BJP in Solapur)

उपराष्ट्रपतीची मिमिक्री करणारे तृणमूल काँग्रेसचे खासदार आणि त्याचा व्हिडिओ बनविणारे खासदार राहुल गांधी यांचा सोलापूर येथे आज भारतीय जनता पक्षाच्या वतीने निषेध करण्यात आला. त्यावेळी साबळे बोलत होते. या वेळी सोलापूरचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे, डॉ. किरण देशमुख यांच्यासह भाजपचे नेतेमंडळी आंदोलनात सहभागी झाले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

देशविरोधी आघाडी-इंडिया आघाडीचा निषेध असो... उपराष्ट्रपतींचा अपमान करणाऱ्या राहुल गांधींचा निषेध... धिक्कार असो धिक्कार असो, राहुल गांधींचा धिक्कार असो, लबाड लांडगा ढोंग करतोय...देशभक्तीचं सोंग करतोय, अशी जोरदार घोषणाबाजी भारतीय जनता पक्षाकडून करण्यात आली.

अमर साबळे म्हणाले की, संसद नियमावलीच्या बाहेर जाऊन शिस्तभंग करत सभागृहात गोंधळ करणाऱ्या खासदारांवर सचिवालयाच्या नियमांच्या आधारे कारवाई करण्यात आली आहे. लोकशाहीच्या मंदिरात लोकांचे प्रश्न मांडणे आणि लोककल्याणकरी विधेयकांना सहकार्य करणे, गरज पडेल तेव्हा त्यामध्ये दुरुस्ती सूचविणे, हे काम खासदारांनी संसदेत करायचं असतं. ते कर्तव्य न बजावता ज्या सदस्यांनी बेशिस्त वर्तन केले आहे, त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

उपराष्ट्रपतिपद हे संविधानिक हे दुसऱ्या क्रमांकाचे पद आहे. या संविधानिक पदावर कर्तव्य बजावत असणारे जगदीप धनखड यांची टिंगलटवाळी करणे, हा देशाचा अवमान आहे. देशाच्या संविधानिक पदाचा अवमान केल्यामुळे मिमिक्री करणाऱ्या खासदारांवर आणि त्यांना साथ देणाऱ्या राहुल गांधींवर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी आमची मागणी आहे. त्या खासदारांनी देशाची माफी मागावी, असेही साबळे म्हणाले.

भाजपचे सोलापूर शहराध्यक्ष नरेंद्र काळे म्हणाले की, उपराष्ट्रपतींची मिमिक्री करून त्यांची टिंगलटवाळी विरोधकांकडून केली जात आहे. हा केवळ उपराष्ट्रपतींचा नव्हे; तर संपूर्ण देश आणि संसदेचा अपमान आहे. हे पद संविधानिक आहे, त्यामुळे हा संविधानाचा अपमान आहे. राहुल गांधी आणि तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी देशाची आणि उपराष्ट्रपती धनखड यांची माफी मागावी, अशी आमची मागणी आहे.

Edited By : Vijay Dudhale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT