Awhad Vs AjitDada : अजितदादांची मिमिक्री करत आव्हाडांचा सवाल; ‘निधी अडवणारे तुम्ही कोण?’

NCP News : राष्ट्रवादी काँग्रेसच्या 12 आमदारांपैकी आता कोणीही फुटणार नाही.
Jitendra Awhad -Ajit Pawar
Jitendra Awhad -Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबरोबर राहिलेल्या बारा आमदारांना दमही देण्यात आला. ‘ह्याला साडेसहाशे दिले...त्याला साडेसाडतशे दिले... तुला एक रुपयाही देणार नाही..’ अशा शब्दांत आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिमिक्री केली. त्याचवेळी आम्ही आमच्या घरच्यांसाठी पैसे मागत नाही. मग आमच्या मतदारसंघातील लोकांचा निधी अडवणारे तुम्ही कोण? असा सवाल केला. (Jitendra Awhad mimicked Deputy CM Ajit Pawar)

अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी अंतिम आठवडा प्रस्तावाच्या चर्चेवर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील बोलले. 'यांनी दोन पक्ष फोडले, आता तिसरा पक्षही फुटण्याच्या मार्गावर' असे विधान केले होते. त्याला विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी उत्तर देताना तुमचे (राष्ट्रवादी काँग्रेस) राहिलेले लोकच फुटणार आहेत’, असे वक्तव्य केले होते. त्यावर बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी वरील भाष्य केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Jitendra Awhad -Ajit Pawar
Dharashiv Loksabha : सुभाष देशमुखांच्या मुलाचे धाराशिवमध्ये झळकले भावी खासदार म्हणून बॅनर...

जितेंद्र आव्हाड म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसच्या 12 आमदारांपैकी आता कोणीही फुटणार नाही. जे राहिले आहेत, ते 12 जणच राहिले आहेत. ते शरद पवार यांच्यावरील प्रेमापोटी राहिले आहेत. आम्ही 12 जण आता मेलो तरी फुटणार नाही. निधी द्या अथवा न द्या. दम द्या. पण आता काहीही होणार नाही. आमच्या 12 आमदारांना दमही देण्यात आला आहे.

तुम्ही आम्हाला निधी नाही दिला तर नाही दिला. आम्ही आमच्या घरच्यांसाठी पैसे मागत नाही. आमच्या मतदारसंघातील लोकांना सरकारी पैशांपासून वंचित ठेवणारे तुम्ही कोण? ते काय महाराष्ट्राचे नागरिक नाहीत काय? त्यांना काय चांगले रस्ते नको आहेत का? तुम्ही त्यांचा निधी अडवणारे कोण? असे सवाल आव्हाड यांनी अजित पवार यांना केले.

Jitendra Awhad -Ajit Pawar
Solapur Loksabha : अमर साबळेंनी वाढवलं भाजपच्या सोलापुरातील इच्छुकांचं टेन्शन

ते म्हणाले की, निधी वाटपाचा समतोल साधला गेला पाहिजे, असा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आहे. विदर्भाचा अनुशेष हा कशावरून आला आणि तो भरून काढा, असे न्यायालयाने का सांगितले. निधीतील असमतोल सर्वोच्च न्यायालयाने अमान्य केला आहे. तुम्हाला निधीचा असमतोल करता येणार नाही, तसेच तो तुमच्या मनासारखा वापरता येणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

(Edited By : Vijay Dudhale)

Jitendra Awhad -Ajit Pawar
Karad Politics : डॉ. भोसले गटाने काढले उट्टे; बहुमत असूनही काँग्रेसने 'सोसायटी' गमावली

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com