Solapur Loksabha : अमर साबळेंनी वाढवलं भाजपच्या सोलापुरातील इच्छुकांचं टेन्शन

BJP News : सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी भाजपकडून अनेक मातब्बर नेत्यांच्या नावांची चर्चा सुरू आहे.
Amar Sable
Amar SableSarkarnama
Published on
Updated on

Solapur News : माजी खासदार आणि भाजप नेते अमर साबळे यांचे सोलापूर शहर आणि जिल्ह्यात दौरे वाढले आहेत. विशेषतः सोलापूर लोकसभा मतदारसंघातील त्यांच्या बैठकांचा धडका पाहता स्थानिक इच्छुकांचे टेन्शन वाढले आहे. वास्तविक साबळे हे सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे समन्वयक आहेत, त्यामुळे आपण दौरे करत आहोत. सोलापूर लोकसभेसाठी आपण इच्छूक नाही. पण, पक्ष देईल ती जबाबदारी आपण पाडू, अशी भूमिका ते मांडत आहेत. त्यामुळे लोकसभा लढवू इच्छिणाऱ्यांमध्ये बैचेनी वाढली आहे. (Amar Sable increased the tension of BJP aspirants in Solapur Loksabha)

सोलापूर लोकसभेत मागील दोन निवडणुकांमध्ये भाजपने उमेदवार रिपीट केलेला नाही. त्यामुळे आगामी निवडणुकीसाठी खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी यांना पुन्हा तिकिट मिळेल, याची खात्री नाही. शिवाय, खासदार महास्वामी यांच्या जातीच्या बनावट प्रमाणपत्राची सध्या चौकशी सुरू आहे. भरीव असे कोणतेही काम महाराजांनी केलेले दिसत नाही, त्यामुळे सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या भाजप उमेदवाराबाबत सध्या उत्सुकता आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Amar Sable
Karad Politics : डॉ. भोसले गटाने काढले उट्टे; बहुमत असूनही काँग्रेसने 'सोसायटी' गमावली

सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी भाजपकडून अनेक मातब्बर नेत्यांच्या नावांची चर्चा सुरू आहे. यामध्ये आमदार राम सातपुते, लक्ष्मण ढोबळे यांच्यासह माजी खासदार अमर साबळे यांचेही नाव आघाडीवर आहे. साबळे यांच्यावर भाजपने सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे समन्वयक म्हणून जबाबदारी दिली आहे. त्यामुळे पक्षसंघटनेच्या कामासाठी ते सोलापूर जिल्ह्यात फिरताना दिसत आहेत. मात्र, सोलापूरसाठी चर्चेत असलेल्या नावांमध्ये साबळे यांचा समावेश आहे. त्यातही संघ परिवारातील चेहरा म्हणून साबळेंची ओळख आहे.

सध्याचे खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्याविषयी सोलापूरकरांमध्ये नाराजी आहे. त्याचबरोबर खुद्द भाजपच्या काही नेत्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. त्यातच त्यांच्या बनावट जातप्रमाणपत्राचा मुद्यामुळे त्यांना पुन्हा उमेदवारी मिळेल, याची खात्री नाही. पक्षाकडून नव्या चेहऱ्याचा शोध सुरू आहे. त्यात माळशिरसचे आमदार राम सातपुते यांचे नाव आघाडीवर आहे. फडणवीसांच्या खास मर्जीतील सातपुते यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता वाटत असतानाच अचानकपणे गेल्या काही महिन्यांपासून पिंपरी-चिंचवडचे अमर साबळे यांची एन्ट्री झाली आहे.

Amar Sable
Loksabha Election 2024 : जळगाव मतदारसंघात भाजपला धक्का; सर्व्हेमध्ये दडलंय काय ?

साबळे यांच्याकडे सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे समन्वयक म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. जबाबदारी मिळाल्यापासून ते सक्रि होत सोलापूर मतदारसंघात फिरत आहेत. विशेषतः शहरासह सोलापूर लोकसभा मतदारसंघातील पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकांचा त्यांनी धडका लावला आहे. सोलापूर शहरात त्यांनी चार दिवसांपूर्वी बैठक घेतली. त्यानंतर बुधवारी त्यांनी मोहोळ आणि पंढरपूर येथे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

Amar Sable
Ram Mandir Inauguration Guest : उद्धव ठाकरेंना निमंत्रण नाही; राऊत म्हणाले, 'ज्याचं योगदानच नाही, त्यांचा तो सोहळा...'

सोलापूर लोकसभेसाठी आपण इच्छूक नाही, असे अमर साबळे यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे. मात्र, ते सांगताना भारतीय जनता पक्ष आपल्याला जी जबाबदारी देईल, ती जबाबदारी आपण पार पाडू, असेही म्हणत आहेत, त्यामुळे सोलापुरातून भाजपने लोकसभेची उमेदवारी दिली तर ते लढायला तयार आहेत, असे स्पष्ट होते. आपल्याला संधी मिळाली तर मागील पंधरा वर्षांतील विकासाचा अनुशेष भरून काढण्याचा शब्दही साबळे देत आहेत.

(Edited By : Vijay Dudhale)

Amar Sable
Parliament Winter Session: संसदेतील घुसखोरीला जबाबदार कोण? मोदींचे 'हे' विधान राजकीय मिमिक्री...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com