Umesh Patil-Rajan Patil  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Rajan Patil Advice Umesh Patil : झेडपीतील पराभवानंतर राजन पाटलांचा राष्ट्रवादीच्या उमेश पाटलांना अनोखा सल्ला...

Mohol Political News : मोहोळमध्ये राजन पाटील व उमेश पाटील यांच्यातील संघर्ष पुन्हा चर्चेत. उमेश पाटील यांच्या आव्हानानंतर झेडपी पराभवावर राजन पाटील यांनी दिलेल्या सल्ल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

Vijaykumar Dudhale

Solapur, 12 February : मोहोळचे माजी आमदार राजन पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांच्यातील राजकीय संघर्ष सर्वश्रूत आहे. जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वी उमेश पाटील यांनी राजन पाटलांना ‘त्यांनी किंवा त्यांच्या मुलांनी अनगर सोडून कोणत्याही मतदारसंघातून माझ्याविरोधात निवडणूक लढवावी, हरलो तर राजकीय संन्यास घेईन’, असे चॅलेंज दिले होते. त्यावर झेडपी निवडणुकीतील पराभवानंतर राजन पाटील यांनी उमेश पाटील यांना एक सल्ला दिला आहे. त्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

सोलापूर जिल्हा परिषदेच्या कुरुल गटातून राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील (Umesh Patil) यांचा भाजपचे सचिन जाधव यांच्याकडून पराभव झाला आहे. त्या पराभवानंतर पारंपारिक विरोधक माजी आमदार राजन पाटील यांनी उमेश पाटील यांच्यावर टीका करण्याची संधी सोडली नाही. त्यातून या दोन पाटलांमध्ये पुन्हा राजकीय कलगीतुरा रंगण्याची चिन्हे आहेत.

राजन पाटील (Rajan Patil) म्हणाले, सोलापूर जिल्हा परिषद आणि मोहोळ पंचायत समितीच्या निवडणुकीतील विजय हा भारतीय जनता पक्षाचे केंद्रीय नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे नेतृत्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सोलापूरचे कणखर पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या विचारावर विश्वास ठेवून मोहोळ तालुक्यातील कार्यकर्त्यांनी अत्यंत पराकष्टाने भाजपची भूमिका शेवटच्या लोकांपर्यंत पोचवली. त्यामुळे हा विजय मतदारांनी भारतीय जनता पक्षावर टाकलेला विश्वास आणि कार्यकर्त्यांचे काम यामुळे आम्ही जिल्हा परिषद आणि मोहोळ पंचायत समितीत हे यश संपादन करू शकलो आहोत.

उमेश पाटील आणि इतरांनी आता तरी शहाणं व्हावं. शहाणे असतील तर त्यांनी शहाणं व्हावं. मोहोळ हा सुसंस्कृत तालुका आहे. सुसंस्कृत विचारधारेने चालणारा हा मोहोळ तालुका आहे. त्यामुळे या तालुक्याला अशा प्रकारची टीका टिपण्णी करणं, खोटं बोलणं, खोटी आश्वासनं देणं, हे मान्य नाही. हा या निवडणुकीच्या निमित्ताने त्यांना तालुक्यातील जनतेने संदेश दिला आहे, असे पाटील यांनी नमूद केले.

उमेश पाटील यांनी जिल्हा परिषद निवडणुकीत पराभूत झालो तर राजकारण सोडेन, असं म्हटलं होतं. त्यावर बोलताना राजन पाटील म्हणाले, पत्रकारांच्या माध्यमातून मी उमेश पाटील यांना सांगू इच्छितो की, ते जर शब्दाला पक्के असतील आणि ते राजकीय संन्यास घेणार असतील तर मी वयाने मोठा असल्यामुळे सल्ला देतो.

आमचे मोहोळचे महमंद आहेत, त्या महंमदकडून मी त्यांना ड्रेस देतो, ते ड्रेस घेऊन त्यांनी सौदत्तीला जावं, असा माझा उमेश पाटील यांना सल्ला असेल, असेही राजन पाटील यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT