Satara ZP : सातारा ZP तील सत्तेबाबत शिवेंद्रराजेंचं मोठं विधान, ‘आम्ही शंभूराज देसाईंकडे बघत बसलोय...’

Shivendraraje-Shambhuraj Desai News : सातारा जिल्हा परिषदेत त्रिशंकू स्थितीमुळे सत्तेची उत्सुकता वाढली. जिल्हा नियोजन समिती बैठकीत शंभूराज देसाई व शिवेंद्रसिंहराजे भोसले एकत्र आले. अध्यक्षपदाबाबत शिवेंद्रराजेंच्या विधानाने राजकीय चर्चांना उधाण आले.
Shivendraraje Bhosale-Shambhuraj Desai
Shivendraraje Bhosale-Shambhuraj Desai sarkarnama
Published on
Updated on

Satara, 12 February : सातारा जिल्हा परिषदेत त्रिशंकू स्थिती असल्याने सत्ता कोणाची येणार, याची उत्सुकता संपूर्ण जिल्ह्याला लागली आहे. त्यातच आज जिल्हा नियोजन समिती बैठकीच्या निमित्ताने पालकमंत्री शंभूराज देसाई आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा भाजप नेते शिवेंद्रसिंहराजे भोसले एकत्र आले होते. त्या बैठकीत सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाबाबत शिवेंद्रराजेंनी मोठे विधान केले आहे.

सातारा जिल्हा परिषद (Satara Zilla Parishad) निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने सर्वाधिक २७, राष्ट्रवादी २० तर, शिवसेनेने १५ जागा जिंकल्या आहेत. निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी आणि शिवसेनेने आघाडी केली होती. त्यामुळे त्यांच्याकडून सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू आहेत. मात्र, शंभूराज देसाई यांनी शिवसेना सदस्यांची मते विचारात घेऊन त्याबाबतचा अहवाल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविण्यात येईल आणि ते अंतिम निर्णय घेतील, असे म्हटले आहे, त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीची युती सत्तेवर येणार की भाजप ऐनवेळी गेम पालटवणार याची चर्चा जिल्ह्यात रंगली आहे.

नियोजन समितीच्या बैठकीनंतर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर आलेले शिवेंद्रराजे भोसले (Shivendraraje Bhosale) आणि शंभूराज देसाई यांना माध्यमांच्या प्रतिनिधींनी गाठले. त्यावेळी त्या दोघांमध्ये पुन्हा जुगलबंदी रंगली. बांधकाम मंत्री शिवेंद्रराजेंना सातारा जिल्हा परिषदेतील सत्तेच्या अनुषंगाने विचारण्यात आले, तेव्हा ते म्हणाले, शंभूराज देसाई हे पालकमंत्री आहेत, त्यांच्या पालकत्वाखाली आम्ही आहोत.

डीपीसीच्या बैठकीत शंभूराज देसाई मला म्हणाले ‘शेजारी बसा. आम्ही हात पुढे करतोय, तर तुम्ही घेईनात.’ त्यावर मी त्यांना म्हटलं, अहो आमची मिठी मारायची तयारी आहे. पण तुम्हाला चालते का नाही...’ असेही मंत्री भोसले यांनी स्पष्ट केले.त

Shivendraraje Bhosale-Shambhuraj Desai
Youngest Member : शिवसेनेचा बालेकिल्ला भूईसपाट करणाऱ्या 22 वर्षांच्या अंकिता वाळूंज ठरल्या सर्वांत तरुण पंचायत समिती सदस्या

तुम्हाला (शिवेंद्रराजे भोसले) दोन वेळा बैठकीला बोलावलं गेलं, पण तुम्ही काय गेला नाहीत, त्यामुळे शंभूराज देसाई यांनी नाराजी व्यक्त केली आहे. यावर शिवेंद्रराजे म्हणाले, असं नाही. मला त्यांनी थेट बोलावलं तर मी कधी येत नाही, असं कधी होत नाही. व्हाया व्हाया निरोप आल्यामुळे जरा घोटाळा झाला.

जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेसाठी एकत्र येणार का, यावर शिवेंद्रराजेंनी ‘आम्ही जिल्ह्याच्या विकासासाठी एकत्र आहोत. आता पुढचे विषय पुढे बघू,’ असे सांगून थेट उत्तर देणे टाळले. जिल्हा परिषदेतील सत्ता स्थापनेबाबत आता शंभूराज देसाई यांनी सांगायचं, असे भोसले म्हणताच शंभूराज देसाई मोठ्याने हासले.

Shivendraraje Bhosale-Shambhuraj Desai
Maharashtra Politic's : उद्धव ठाकरेंच्या 'त्या' निर्णयावर राज ठाकरे नाराज; राऊतांनी तातडीने गाठले शिवतीर्थ, दोघांत दीड तास चर्चा

आम्ही काय आता शंभूराज यांच्याकडे बघत बसलोय, त्यांनी सांगायचं. भारतीय जनता पक्ष आकड्याने मोठा असला तरी शंभूराज हे आमच्यापेक्षा मोठे आहेत. मोठ्यांनी सांभाळून घेतलं पाहिजे. त्यांनी दोनवेळा बैठकीला बोलावलं तेव्हा वातावरण जरा नीट नव्हतं. आता नीट झालं आहे, असे सांगून झेडपीतील निकालावरही शिवेंद्रराजेंनी अप्रत्यक्ष भाष्य केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com