Ramdas Athawale Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Maratha Reservation : मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याचा आठवलेंनी सांगितला फॉर्म्युला...

Ramdas Athawale News : मनोज जरांगे पाटील यांच्या आरक्षणाच्या मागणीला आमचा पूर्ण पाठिंबा आहे.

विश्वभूषण लिमये

Solapur News : मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्यायचा असेल, तर केंद्रीय पातळीवर ‘क्षत्रिय ओबीसी’ अशा पद्धतीची वेगळी कॅटेगरी त्यासाठी तयार करावी. जेणेकरून देशभरातील पाटीदार, जाट, मराठा या विविध क्षत्रिय समाजाला ओबीसी कॅटेगरीमधून आरक्षण देणे शक्य होईल, असा तोडगा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सुचविला आहे. (Ramdas Athawale Solapur Tour )

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे आज (ता. २५ फेब्रुवारी) सोलापूरच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याचा तोडगा सुचविला आहे. ते म्हणाले, मराठा आरक्षणाला आम्ही पहिल्यांदाच पाठिंबा दिलेला आहे. मराठा समाजातील काही जण जमीनदार आहेत, हे जरी मान्य असेल तरी ज्यांचे उत्पन्न 8 लाखांच्या खाली आहे, त्यांना आरक्षण मिळावे, ही आमची भूमिका आहे. (Manoj Jarange Patil)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन करू नये, त्यांच्या आरक्षणाच्या मागणीला आमचा पूर्ण पाठिंबा आहे. माझी भूमिका आहे की, मराठा समाजाला आरक्षण मिळावे. पण, ते ओबीसीतून देण्यात येऊ नये. जे कुणबी आहेत, त्यांना ओबीसीतून मिळेल. पण, पश्चिम महाराष्ट्रामध्ये जी मागणी होतेय, त्यानुसार त्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार नाही, असेही आठवले यांनी नमूद केले.

आठवले म्हणाले, कालेकर आयोगानुसार 52 टक्के ओबीसी आहेत. लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण द्यायचं असेल, तरी त्यांना 52 टक्के आरक्षण द्यावे लागेल. पण, सर्वोच न्यायालयाने ते 27 टक्के आरक्षण द्यावे, असे सांगितले, त्यामुळे ओबीसी म्हणतात आम्हाला आधीच आरक्षण कमी आहे. त्यामुळे ओबीसीमध्ये सब कॅटगरी करण्यासंदर्भात सध्या चर्चा सुरू आहे.

प्रत्येक जातींचे किती प्रमाण आहे, ते समोर येण्यासाठी जातीय जनगणना होणे गरजेचे आहे. आमची (मागासवर्गीय) लोकसंख्या देखील आता वाढली आहे, त्यामुळे आमची मागणी आहे, आमचं आम्हाला द्या. नंतर राहिलेलं सगळं तुम्ही वाटून घ्या, असेही आठवले यांनी स्पष्ट केले.

‘मोदींची भूमिका डॉ. आंबडेकरांसारखीच’

नरेंद्र मोदींची भूमिका ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधान मजबूत करणाऱ्या भूमिकासारखी आहे. काही लोकं म्हणतात, मोदी हे संविधान बदलण्याचा प्रयत्न करत आहेत, संविधान कोणाच्या बापाला बदलता येणार नाही. कायदामध्ये दुरुस्तीचा अधिकार संविधानानेच दिलाय, त्यानुसार काही कायदे होत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT