Ranjit Singh Naik Nimbalkar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Ranjeetsingh Nimbalkar News : माढातून पुन्हा रणजितसिंह निंबाळकरच; आता रामराजेंच्या भूमिकेकडे लक्ष!

Loksabha Election 2024 : राष्ट्रवादीचे नेते रामराजे नाईक निंबाळकर व त्यांचे बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

उमेश भांबरे :सरकारनामा

Madha Loksabha Constituency News : भारतीय जनता पक्षाची 20 उमेदवारांची यादी बुधवारी जाहीर झाली. यामध्ये माढा मतदारसंघातून विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनाच पुन्हा उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे फलटण तालुक्यात त्यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला आहे. तर आता राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते व माज़ी सभापती रामराजे नाईक निंबाळक़र कोणती भूमिका घेणार, बंधू संजीवराजेंच्या उमेदवारीसाठी अजित पवारांची साथ सोडून खासदार शरद पवार गटात जाणार का?, याची उत्सुकता जिल्ह्यात आहे.

माढा लोकसभेच्या उमेदवारीवरुन भाजप व राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरु होती. फलटणच्या दोन निंबाळकरांत एकमेकांना आव्हान देण्यापर्यंत वाद पेटला होती. कोणत्याही परिस्थितीत माढातून संजीवराजे नाईक निंबाळकर यांचीच उमेदवारी आणणार, रणजितसिंह निंबाळकरांना(Ranjit Singh Nimbalkar) तिकिट मिळू देणार नाही, असे आव्हान माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिले होते. तर रणजितसिंह निंबाळकर यांनी शांत राहणे पसंत करत उमेदवारीवर कोणतेही भाष्य करणे टाळले होते.

माढा मतदारसंघावरुन रामराजे व रणजितसिंह निंबाळक़र यांच्यात चांगलाच वाद रंगला होता. त्यानंतरही रामराजेंनी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या माध्यमातून महायुतीच्या जागा वाटपात माढ्याची जागा राष्ट्रवादीकडे घेण्यासाठी दबाव तंत्रही वापरले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मात्र, आज जाहीर झालेल्या भाजपच्या लोकसभेच्या उमेदवारांच्या यादीत महाराष्ट्रातील पहिल्या 20 उमेदवारांची नावे असून यामध्ये माढा मतदारसंघातून विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. या उमेदवारीमुळे फलटण तालुक्यात खासदार निंबाळकरांच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला. माढातून खासदार निंबाळकरांच्या उमेदवारीमुळे आता राष्ट्रवादीचे नेते रामराजे नाईक निंबाळकर व त्यांचे बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या(Ajit Pawar) माध्यमातून दबावतंत्र वापरुनही रामराजे आपल्या बंधूला माढातून उमेदवारी मिळवून देण्यात अपयशी ठरले आहेत. त्यामुळे महायुतीचा उमेदवार म्हणून खासदार निंबाळकरांना निवडून आणण्यात मदत करणार की तटस्थ भूमिका घेणार हेही तितकेच महत्वाचे आहे. आता त्यांच्यापुढे बंधूंची नाराजी दूर करण्याची एक संधी आहे. ती संधी म्हणजे खासदार शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करुन महाविकास आघाडीतून उमेदवारी मिळवून देणे हाच एकमेव पर्याय आहे.

पण, महाविकास आघाडीतून खासदार शरद पवार यांनी रासपचे नेते महादेव जानकर(Mahadev Jankar) यांना काम सुरु करण्याचीसूचना केली आहे. त्यामुळे तिकडेही रामराजेंपुढे अडचण आहे. त्यामुळे रणजितसिंह निंबाळकर यांच्या विरोधात ते काम करुन त्यांची राष्ट्रवादीतील मते इतरत्र वळविण्याचा प्रयत्नही रामराजेंकडून होऊ शकतो. त्यामुळे आता अजित पवार यांची राष्ट्रवादी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांना मदत करुन महायुतीचा धर्म पाळणार का, हा प्रश्न महत्वाचा आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT