Satara Political News : सातारा जिल्ह्यातील वडूज तहसीलदार कार्यालयावर औंधसह 16 गावांच्या उपसा सिंचन योजनेला गती व येथील शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी जानेवारी महिन्यात औंध परिसरातील सर्व गावातील शेतकरी, कष्टकरी यांचा महामोर्चा काढण्यात येणार असल्याचे येथील बैठकीत ठरले आहे.
खटाव (Khatav) तालुक्यातील औंधसह 16 गावांच्या सिंचन योजनेला निधी उपलब्ध होण्यासाठी शेती पाणी संघर्ष समितीने सातारा (Satara) जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेते मंडळीना निवेदने दिली. त्याचा आढावा घेण्यासाठी मंगळवारी औंध येथे कमिटीची बैठक घेण्यात आली. यावेळी अध्यक्ष संतोष मांडवे, सूर्यभान जाधव उपस्थित होते.
यावेळी मांडवे म्हणाले,आता आपला संयमाचा बांध फुटला आहे,औंध, वरुड, नागाचे कुमठे, गोसाव्याचीवाडी, गोपूज, वाकळवाडी, पळशी, खरशिंगे, करांडेवाडी, गणेशवाडी, नांदोशी, त्रिमली, लांडेवाडी, खबालवाडी, जायगाव अंभेरी, लोणी, भोसरे, कोकराळे, गुरसाळे, सिद्धेश्वर कुरोली, धकटवाडी आदी गावांमधून युवक, अबालवृद्ध, माता - भगिनी यांना सोबत घेणार आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
मोठ्या संख्येने प्रशासनाला जाग आणण्यासाठी व येथील शेतकऱ्यांच्या व्यथा मांडण्यासाठी या जानेवारी महिन्यात मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. सूर्यभान जाधव म्हणाले की, आम्ही सर्व नेते मंडळी, प्रशासन यांना निवेदन, मागण्या वेळोवेळी देत आलो आहोत मात्र अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा अधिक दोषी असतो.
त्यामुळे आता संघर्ष केल्याशिवाय काही मिळणार नाही,या योजनेला निधी मिळाल्याशिवाय व पाणी शिवारात आणल्याशिवाय आपण स्वस्थ बसून चालणार नाही, यावेळी उपस्थितानीही आपल्या भावना व्यक्त केल्या.
(Edited by Amol Sutar)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.