Amit Thackeray, Sanjay Raut Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satara News : ..संजय राऊत आलेत का ? ठाकरेंनी उडवली मनसे स्टाईलमध्ये खिल्ली..!

सरकारनामा ब्यूरो

Satara News : घोडा शर्यंती आणि बैलगाडी शर्यंती विषयी राज ठाकरे यांचे चिरंजीव आणि मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे बोलत असताना मध्येच अचानक सूत्रसंचालकाने बोलण्यास सुरुवात केली असता, अमित ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया मध्येच थांबवत. या ठिकाणी संजय राऊत आलेत का? असे म्हणत राऊतांची खिल्ली उडवली. यावेळी उपस्थितीत एकच हश्या पिकला. माझ्या आयुष्यातील पहिली बैलगाडा शर्यंत पाहण्यासाठी मी आलो असल्याचे त्यांनी सांगितले.

मनसे MNS विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे Amit Thackeray हे आज साताऱ्यातील कोरेगाव येथे आयोजित केलेल्या मनसे केसरी बैलगाडा शर्यतीसाठी उपस्थित राहिले होते. यावेळी त्यांचे जंगी स्वागत झाल्यानंतर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना बैलगाडीमध्ये बसण्याची विनंती केली. मात्र, अमित ठाकरे स्वतः हा बैलगाडी सोबत जोडलेल्या बैलांच्या बरोबर चालत स्टेजपर्यंत आले आणि दोन्ही बैलांना स्वतःचे मस्तक लावून नमन केले. यावेळी बैलाविषयी असणारा त्यांचा आदर पाहायला मिळाला.

कोरेगाव (जि. सातारा) येथे आयोजित केलेल्या बैलगाडा शर्यतीसाठी जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातून मोठ्या संख्येने बैलगाडी स्पर्धकांनी आणि शौकिनांनी आपली उपस्थिती लावली होती. यादरम्यान सध्या राज्यभरात बैलगाडा शर्यती मध्ये चर्चेत असणारा बकासुर बैलाला पाहण्यासाठी अमित ठाकरे हे आवर्जून स्टेजवरून खाली आले.

अमित ठाकरे यांनी बकासूर बैलाच्या मालकासोबत बैलाच्या आरोग्याची विचारपूस केली आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तत्पूर्वी, या बैलगाडी शर्यतीसाठी आलेल्या अमित ठाकरे यांचे साताऱ्यातील बाॅम्बे रेस्टारंट चाैकात सातारी कंदी पेढ्याचा हार घालून जंगी स्वागत करण्यात आले. अमित ठाकरे म्हणाले, माझ्या आयुष्यातील पहिली शर्यत आहे. प्राण्यांच्या डोळ्यात आनंद दिसत असतो, आज मला शर्यतीचे बैल पाहून घरातील प्राण्यांची आठवण आली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आज मनसे हा एकमेव पक्ष लोकांच्यासाठी काम करत आहे. आजच्या राजकारणामुळे लोकांच्या आमच्याकडून अपेक्षा वाढल्या आहेत. आगामी काळात आम्ही राज्यात ठिकठिकाणी बैलगाडी शर्यत घेवू. लोकांच्यासाठी आज कोणताही पक्ष काम करत नसल्यामुळे लोकांचा अपेक्षाभंग झाला आहे.

( Edited by Amol Sutar )

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT