Nagar News : ते आले.. पाहिलं अन् जिंकले सुद्धा..! ढाकणेंच्या सुसंस्कृतपणाने विखे - राजळे चकित..?

Pratap Dhakne Sujay Vikhe Monica Rajle felicitation : अकोला गावात आलेल्या भाजप पाहुण्यांचा राष्ट्रवादी सरचिटणीसांकडून सत्कार
Monica Rajale, Sujay Vikhe, Pratap Dhakne
Monica Rajale, Sujay Vikhe, Pratap DhakneSarkarnama
Published on
Updated on

Nagar News : राजकीय वैर आणि भारतीय संस्कृती यात समतोल साधतो तो राजकारणी नेता प्रगल्भ समजला जातो. महाराष्ट्राला या सुसंस्कृत परंपरेचा मोठा वारसा आहे. याच शृंखलेला साजेशी कृती राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस प्रताप ढाकणे यांच्याकडून झाली आणि विरोधकांनाही त्यांचे कौतुक करावे लागले.

ढाकणेंच्या अकोला गावात खासदार सुजय विखे Sujay Vikhe आणि आमदार मोनिका राजळे Monika Rajale या भाजप नेत्यांच्या कार्यक्रमात अचानक काही असे घडले की सर्वच चकित झाले. जिल्ह्यात जवळपास सर्वच मतदारसंघात अनेक पारंपरिक राजकीय संघर्ष करणारी प्रस्थापित घराणी आहेत. यात पाथर्डीत राजळे - ढाकणे राजकीय तीव्र संघर्ष हा टोकाचा म्हणूनच पाहिला जातो.

Monica Rajale, Sujay Vikhe, Pratap Dhakne
MLA Disqualification Case: 'उद्धव ठाकरेंनीच पुन्हा भाजपसोबत...'; सामंतांचा मोठा गौप्यस्फोट

राजळे परिवार कधी काँग्रेस Congress, राष्ट्रवादी NCP प्रवास करत भाजपात स्थिरावला. तर ढाकणे परिवाराचा प्रवासही इतर पक्ष, नंतर अनेकवर्षे भाजप BJP असा होत राष्ट्रवादी पक्षात स्थिरावला. यात राजळे परिवाराला सत्तेच्या खेळात नेहमीच साथ मिळाली. आप्पासाहेब राजळे, दिवंगत राजीव राजळे आणि आता मोनिका राजळे यांना सत्तेचा राजयोग आपसूक लाभला.

मात्र दिवंगत बबनराव ढाकणे यांच्यानंतर ढाकणे परिवाराचे प्रताप ढाकणे Pratap Dhakane यांना मात्र सत्तेच्या राजकीय संघर्षात राजळें कडून नेहमीच हार पत्करावी लागली. तरीही प्रतापकाकांनी वडिलांप्रमाणे एक संघर्ष योध्याच्या मुलाला शोभेल असा राजकीय संघर्ष नेहमीच पेटता ठेवला. हा राजळे-ढाकणे संघर्ष आत्ताही कायम असला तरी ढाकणेंच्या अकोला गावात राजळे-विखे या सत्तेतल्या नेत्यांच्या उपस्थितीत चालू कार्यक्रमात राष्ट्रवादीच्या प्रताप ढाकणे यांनी अचानक आगंतुक प्रवेश केला आणि एकच तणावपूर्ण शांतता पसरली.

यावेळी नेमके आ.मोनिका राजळे यांचे भाषण सुरू होते. तर खा.सुजय विखे व्यासपीठावर उपस्थित होते. मात्र ढाकणे यांनी व्यासपीठावर आल्यानंतर खा.सुजय विखे आणि आ.मोनिका राजळे यांचा शाल - श्रीफळ देत सत्कार केला आणि एकूणच सर्व वातावरण टेन्शन फ्री झाले. यावेळी कार्यक्रमात आगंतुक आले असले तरी भाजपच्या या कार्यक्रमात का आलो याचा उलगडा ढाकणे यांनी केला.

दिवंगत ढाकणे यांचे अकोले हे गाव. त्यामुळे आपल्या गावात कोणत्याही पक्षाचा नेता आला तर बबनराव ढाकणे हे आवर्जून त्यांचा सत्कार करत. गावात आलेला हा पाहुणा असतो आणि आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करणे ही आपली संस्कृती असल्याचे यावेळी प्रताप ढाकणे यांनी सांगितले. बाळासाहेब विखे हयात असताना गावात आले असता बबनराव ढाकणे यांनी त्यांची आवर्जून भेट घेत स्वागत करत सत्कार केला असल्याची आठवण सांगितली.

Monica Rajale, Sujay Vikhe, Pratap Dhakne
Cricketnama 2023 : शिवेंद्रराजे, जयकुमार गोरेंच्या बॅटिंगवर फडणवीसांचा विश्वास; सातारचे खेळाडू नागपूर गाजवणार

त्यामुळे खा.सुजय विखे हे पहिल्यांदाच आपल्या गावात आल्याचे समजल्याने आल्याचेही सांगितले. त्याच अनुषंगाने आपल्या गावात खा.विखे आणि आ.राजळे हे आले आहेत याची माहिती मिळाली आणि अनायासे गावातच असल्याने गावची परंपरा पाळत आपण या ठिकाणी येऊन दोघांचा सत्कार केल्याचे सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

एकेकाळी बाळासाहेब विखे-बबनराव ढाकणे यांची राजकीय सहमती एक्सप्रेस चर्चेचा विषय असल्याची आठवण प्रतापकाकांनी यावेळी सांगितली. ढाकणे अचानक कार्यक्रम स्थळी आले असले तरी आता या भेटीची राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. गेल्याच आठवड्यात एका रस्त्याच्या कामाच्या विलंबाचे कारणास्तव ढाकणे यांनी मोठे आंदोलन करत राजळेंवर टीका केली होती तर आ.राजळे यांनीही ढाकणेंना खोचक प्रत्युउत्तर दिले होते.

आ.राजळे यांच्या विरोधात पक्षातीलच एक गट नाराज असून उघड टीका करत आहे. एकूणच या पार्श्वभूमीवर ढाकणेंची खा.विखें असताना केलेली एन्ट्री नेमकी काय समजायची याचीही चर्चा चवीने होत आहे.

( Edited by Amol Sutar )

Monica Rajale, Sujay Vikhe, Pratap Dhakne
Maratha Reservation : भुजबळ 'पिऊन' बोलतायेत काय?; मराठा महासंघाची खोचक टीका

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com