Satara Political News EKnath Shinde Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satara Political News : मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात शिवसेनेचाच खासदार; शिवसैनिकांच्या आग्रहामुळे भाजपची कोंडी?

Umesh Bambare-Patil

Satara shivsena news : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सातारा जिल्ह्यात खासदार शिवसेनेचाच होणार, अशी मागणी करत जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी थेट वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली. कार्यकर्त्यांच्या आग्रही भूमिकेचे मुख्यमंत्र्यांनी समर्थन करत सातारा लोकसभेची जागा आपण लढवू, असे सांगून या जागेसाठी आपण आग्रही राहणार असल्याचे स्पष्ट केले. (Latest Political News)

सातारा लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेनेसाठी जिल्ह्यात सकारात्मक वातावरण आहे, त्यामुळे येथे शिवसेनेचाच उमेदवार द्यावा अशी मागणी पदाधिकारी व शिवसैनिकांनी केली. 'अभी नही तो कभी नही' च्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या आग्रही भूमिकेचे मुख्यमंत्र्यांनी समर्थन करीत साताऱ्याची जागा आपण लढवू असे सांगून या जागेसाठी आपण आग्रही राहणार असल्याचे स्पष्ट केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

याप्रसंगी बोलताना पुरुषोत्तम जाधव म्हणाले, '2009 ची लोकसभा निवडणूक मी शिवसेना भाजप युतीचा उमेदवार म्हणून लढलो. त्यावेळी मला दोन लाख 34 हजार 56 मते पडली. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत शिवरायांचा गादीचा जिल्हा कोणतेही कारण नसताना मित्र पक्षाला सोडण्यात आला. त्यावेळी अन्यायाला वाचा फोडण्यासाठी मी सातारा लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election) अपक्ष लढलो. त्यावेळी मला एक लाख 56 हजार मते पडली. त्यावेळी देशात मोदी लाट होती. परंतु त्या लाटेमध्ये देखील मला भारत देशातील अपक्ष उमेदवारांमध्ये क्रमांक दोनची मते पडली आहेत."

"2014 मध्येच शिवसेनेचा (Shiv Sena) भगवा फडकला असता, परंतु उद्धव ठाकरे यांनी मी तयारी करून देखील माझ्यावर अन्याय केला आहे. त्यानंतर 2019 च्या पंचवार्षिक लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपामधून नरेंद्र पाटील (Narendra Patil) शिवसेनेमध्ये येऊन धनुष्यबाण या चिन्हावर लढले होते. कारण हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला आहे म्हणूनच. त्यामुळे आताच्या निवडणुकीत शिवसेनेला हा मतदारसंघ मिळायला हवा, त्यासाठी आपण आग्रही भूमिका घ्यावी," अशी मागणी केली.

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT