Pramod Mahajan-Gopinath Munde-Jayant Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Ram Mandir : जयंतरावांनी मतदारसंघात बांधलेले राम मंदिर पाहून मुंडे-महाजन काय म्हणाले होते? बघा...

Vijaykumar Dudhale

Sangli News : ‘मी माझ्या मतदारसंघात रामाचे मंदिर उभारले आहे. ते मंदिर पाहून (स्व.) प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांनी माझ्याकडे आल्यानंतर ‘आम्ही फक्त मंदिर बांधण्याची भाषणे करतो, तुम्ही तर प्रत्यक्षात मंदिर बांधले देखील..’ असे विधान केले होते,’ अशी आठवण राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितली. (Seeing the Ram temple built by Jayant Patil in the constituency, Munde-Mahajan said...)

अयोध्येत राम मंदिर उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आहे. येत्या २० जानेवारी रोजी राम मंदिराचे उद्‌घाटन करण्यात येणार आहे. त्यामुळे सर्वत्र श्री राम मंदिरमय वातावरण आहे. देशातील अनेक मान्यवरांना मंदिर उदघाटनाच्या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आलेले आहे. त्यामुळे देशभरात राम मंदिर उदघाटन कार्यक्रमाचा माहोल आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी मुलाखत घेतली आहे. त्या मुलाखतीत बोलताना जयंत पाटील यांनी राम मंदिराबाबत भाष्य केले आहे. ते म्हणाले की, मी माझ्या मतदारसंघात उत्तम असे श्री रामाचे मंदिर उभारले आहे. पण, त्यावर मी कधीही मते मागितली नाहीत.

(स्व.) गोपीनाथ मुंडे आणि (स्व.) प्रमोद महाजन हे एकदा माझ्या मतदारसंघात आले होते. ते श्री रामाचे मंदिर पाहून त्यांनी म्हटले की, ‘आम्ही फक्त मंदिर बांधण्याची भाषणे करतो, तुम्ही तर प्रत्यक्षात मंदिर बांधले देखील...’ असे विधान केले होते, अशी आठवण ही जयंत पाटील यांनी सांगितली.

भारतीय जनता पक्ष सत्तेत आला तर आम्ही अयोध्येची वारी करू, असे विधान काही नेत्यांकडून करण्यात आली आहेत. त्याबाबतही जयंत पाटील यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले की, ती विधानं अत्यंत आक्षेपार्ह आहेत. कारण आम्हीही रामाचे भक्त आहोत. पण आम्ही अशी विधानं कधी करत नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT