MLA Balasaheb Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Balasaheb Patil : बाळासाहेब पाटलांचा गंभीर आरोप; म्हणाले, 'कोणाच्या तरी दबावाखाली निवडणूक आयोगाने...'

Election Commission Decision Ncp Crisis : 'शरद पवारांनी आत्तापर्यंत पाच चिन्ह निवडणुकीत वापरली आहेत.'

Vishal Patil

Karad News : राष्ट्रवादी पक्ष मुळात शरद पवार यांनी स्थापन केला. आता काही मंडळी बाहेर गेले असून त्यांनी भाजप- शिंदे गटाला पाठिंबा देऊन सत्तेत गेले. पक्ष सुनावणी झाली असली तरी मूळ संघटना शरद पवार यांच्यासोबत आहे. त्यामुळे हा निकाल शरद पवार यांच्या बाजूने देणे अपेक्षित होते. परंतु, देशातील एकंदरीत परिस्थिती बघता कोणाच्या तरी दबावाखाली निवडणूक आयोगाने निकाल दिला असल्याचा आरोप माजी मंत्री आणि शरद पवार गटाचे आमदार बाळासाहेब पाटलांनी केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) आणि घड्याळ चिन्ह अजित पवार यांच्या गटाला दिल्यानंतर आता शरद पवार गटाकडून भाजपवर टीका केली जात आहे. निवडणूक आयोगाने दिलेला निकाल हा कोणाच्यातरी दबावाखाली असल्याचा आरोप शरद पवार गटाचे आमदार बाळासाहेब पाटील यांनी केल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. ते कराड येथे बोलत होते.

राजकारणात यशवंतराव चव्हाण, वसंतदादा, विलासराव देशमुख हे होते. आता शरद पवार अनेक वर्ष राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात प्रवास करत आहेत. त्यांनी आत्तापर्यंत पाच चिन्ह निवडणुकीत वापरली. त्यामुळे जनतेच्या मनात शरद पवार (Sharad Pawar) हेच आहेत. आमचा पक्ष, आमचा विचार आणि आमचं चिन्ह हे पवारच आहेत. देशातील आणि राज्यातील जनतेचा विश्वास आहे. आता जे चिन्ह येईल. त्या चिन्हाच्या माध्यमातून आम्ही निवडणुकीला सामोरे जाऊ, असेही आमदार बाळासाहेब पाटलांनी सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

गेल्या काही महिन्यापूर्वी राष्ट्रवादीत अजित पवार(AJit Pawar) गट आणि शरद पवार गट अशी फूट पडली‌ या फुटीनंतर राज्यातील अनेक आमदार कोणत्या गटात असणार याबाबत वेगवेगळ्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र, राज्यात पहिल्यांदा जाहीरपणे कराड उत्तरचे विद्यमान आमदार आणि माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी 'आम्ही साहेबांसोबत' अशा आशयाचे बॅनरच कराड तालुक्यात लावले होते. त्यामुळे अजित पवार गटाकडे जाणाऱ्या सत्तेतील वाटेकरी आमदारांना आमदार बाळासाहेब पाटील यांनी शरद पवार यांच्यासोबत असल्याचे जाहीरपणे सांगितले होते.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT