Sharad Pawar-Mahadev Jankar  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Pawar On Mahadev Jankar : शरद पवारांनी महादेव जानकरांचे नाव घेणंही टाळलं...

Madha Lok Sabha Constituency : माढ्याची जागा धनगर समाजाला द्यावी, अशी आमची इच्छा होती. ती इच्छा मी जाहीरपणाने बोलून दाखवली होती. त्यासाठी ज्यांचं (महादेव जानकर) नाव तुम्ही आता घेतलं. त्यांच्याशी आमचा विचारविनिमयही झाला होता.

Vijaykumar Dudhale

Satara, 29 March : महाविकास आघाडीकडून माढा लोकसभा मतदारसंघ राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांच्यासाठी सोडण्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी जाहीर केले होते. त्याबाबत दोघांमध्ये चर्चाही झाली होती. मात्र, जानकर यांनी अचानक ‘यू टर्न’ घेत महायुतीसोबत राहण्याचे जाहीर केले. त्यामुळे सातारा दौऱ्यावर आलेल्या पवारांना याबाबत प्रश्न विचारला असताना त्यांनी जानकरांचे नावही घेतले नाही.

लोकसभेचा उमेदवार ठरविण्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) हे आज सातारा (Satara) जिल्हा दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांना माढ्यातून महादेव जानकर (Mahadev Jankar) यांचे नाव होते. आता माढ्यातून तुतारीवर राष्ट्रवादी निवडणूक लढवणार का, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी उत्तर देताना पवारांनी महादेव जानकर यांचे नाव घेण्याचेही टाळले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शरद पवार म्हणाले, माढ्याची जागा धनगर समाजाला द्यावी, अशी आमची इच्छा होती. ती इच्छा मी जाहीरपणाने बोलून दाखवली होती. त्यासाठी ज्यांचं (महादेव जानकर) नाव तुम्ही आता घेतलं. त्यांच्याशी आमचा विचारविनिमयही झाला होता. त्याला त्यांनी संमतीही दिली होती. नंतर काय झालं माहितं नाही. पण, मतदार पळवतात, त्या प्रमाणे या निवडणुकीत उमेदवारही पळवतात, हे दिसून आलं, असं चित्र दिसून आलं.

माढ्यातून धनगर समाजाला उमेदवारी द्यावी, ही इच्छा पूर्ण करण्यासाठी आम्ही योग्य उमेदवाराचा शोध घेतोय. आमच्याकडे लोकांचे अर्जही आले आहेत, मागणी आहे. काही उच्चशिक्षित लोकांच्या उमेदवारीसाठी आमच्याकडे मागणी आहे. पण, सामाजिक संतुलन ठेवता आले तर आम्हाला आनंद आहे. त्यादृष्टीने आम्ही खोलात जात आहोत, असे सूचक विधानही शरद पवार यांनी केले.

दरम्यान, सातारा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली आहे. त्यामुळे साताऱ्याचा उमेदवार कोण असावा, याबाबत शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत चर्चा केली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी सातारा लोकसभा मतदारसंघासाठी शशिकांत शिंदे, बाळासाहेब पाटील, सुनील माने यांची नावे आमच्याकडे आहेत, असे स्पष्ट केले.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT