Sharad Pawar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sharad Pawar News : साताऱ्यातून लोकसभा लढण्यास शरद पवारांचा नकार; काय आहे कारण?

Lok Sabha Election 2024 : सातारा लोकसभा मतदारसंघासाठी माझंही नाव काही लोकांनी सुचवलं. पण, राज्याची जबाबदारी असल्याने मला अधिक लक्ष द्यावं लागत आहे. जरी तुमची इच्छा असली तरी ती पूर्ण करता येणार नाही

Umesh Bambare-Patil

Satara, 29 March : साताऱ्यातील राष्ट्रवादीचे पदाधिकरी आणि कार्यकर्ते यांच्या बैठकीत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सातारा लोकसभा लढण्यास आपण इच्छुक नसल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले, माझं नाव काही लोकांनी सुचवलं. पण, राज्याची जबाबदारी असल्याने मला अधिक लक्ष द्यावं लागत आहे. तुमची इच्छा असली तरी ती मला पूर्ण करता येणार नाही, असे सांगून पवारांनी सातारा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची शक्यता फेटाळून लावली.

ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्या उपस्थितीत आज (ता. 29 मार्च) साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची बैठक झाली. या बैठकीत त्यांनी विधानसभा मतदारसंघनिहाय पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेतली, त्यानंतर त्यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, सातारा (Satara) जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद असून, कार्यकर्त्यांनी केलेल्या सूचनांमुळे साताऱ्यातील ताकद आजही अबाधित आहे, हे मला जाणवले. महाविकास आघाडीतील तीनही पक्षांचे एकमत घेऊन काम करावे लागते, त्यामुळे उमेदवारी घोषित करायला थोडा उशीर लागत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शरद पवार म्हणाले, खासदार श्रीनिवास पाटील (Shrinivas Patil) यांची संसदेत कामगिरी चांगली होती. या वेळी त्यांनी पुन्हा निवडणुकीला उभ राहावं, अशी इच्छा होती. पण स्वतः श्रीनिवास पाटील यांनीच प्रकृतीचे कारण देत मी मतदारांना न्याय देत नसेल, तर मी उभा राहायला स्वारस्य नाही, असे त्यांनी सांगितले आहे.

प्रकृतीच्या कारणामुळे मी सातारा लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीला उभे राहू शकत नसलो, तरी पक्षाचे काम मी करणार आहे, असे खासदार श्रीनिवास पाटील यांनी मला सांगितले आहे, असेही पवारांनी नमूद केले.

शरद पवार म्हणाले, सातारा लोकसभा मतदारसंघासाठी माझंही नाव काही लोकांनी सुचवलं. पण, राज्याची जबाबदारी असल्याने मला अधिक लक्ष द्यावं लागत आहे. जरी तुमची इच्छा असली तरी ती पूर्ण करता येणार नाही, असेही पवार यांनी सांगून साताऱ्यातून लोकसभा निवडणूक लढविण्याच्या चर्चेला पूर्णविराम दिला.

Edited By : Vijay Dudhale

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT