Uddhav Thackeray, Ramdas Kadam Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Shivsena Mahaadhiveshan : ...तर उद्धव ठाकरेंनी माझ्या घरची भांडी घासावीत; रामदास कदमांचा घणाघात

Amol Sutar

Kolhapur News : शिवसेनेचे महाअधिवेशन कोल्हापूर येथे सुरू आहे. यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीकेची झोड उठविली. या वेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत 55 वर्षे होतो, पण आता उद्धव ठाकरे आणि त्यांचं पिल्लू आदित्य ठाकरे यांचं वागणं बरं नसल्याची टीका त्यांनी केली. उद्धव ठाकरे यांनी आम्ही पन्नास खोके घेतले हे सिद्ध करावे, तर मी त्यांच्या घरी भाडी घासेन आणि नाही केले तर त्यांनी माझ्या घरची भांडी घासावीत, असा घणाघात कदम यांनी केला.

शिवसेनेची वाटचाल काय असणार याबाबत कोल्हापुरातील महाअधिवेशनात चर्चा झाली. आगामी काळात महायुतीच्या माध्यमातून लोकसभा, तसेच विधानसभा निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी रणनीती आखण्यात आली. या वेळी शिवसेना नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत 55 वर्षे होतो, पण आता उद्धव ठाकरे आणि त्यांचं पिल्लू आदित्य ठाकरे यांचं वागणं बरं नाही.

त्यांचे टोमणे मारण्याचे काम सुरू आहेत. दिवा विजण्याच्या आधी फडफडतो, अशीच त्यांची परिस्थिती आहे. सकाळी उठल्यापासून पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करण्याचे काम त्यांचे सुरू आहे. त्यांच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात ते नालायक व कर्तृत्वहीन मुख्यमंत्री राहिले असल्याची टीका कदम यांनी ठाकरेंवर केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पन्नास खोके घेतल्याचा आरोप ठाकरे यांच्याकडून मुख्यमंत्री शिंदे गटाच्या आमदारांवर करण्यात आला होता. त्यावर रामदास कदम म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी आम्ही पन्नास खोके घेतले हे सिद्ध करावे, मी मातोश्रीवर जाऊन भांडी घासेन. जर त्यांनी सिद्ध केलं नाही तर त्यांनी माझ्या घरात भांडी घासावीत, असा घणाघात कदम यांनी ठाकरेंवर केला.

दुसऱ्यांवर टीका करण्यापेक्षा उद्धव ठाकरे यांनी आत्मपरीक्षण करावे, सगळे आपल्याला सोडून का गेले ? माझे आणि दिवाकर रावते यांचे पद काढले आणि पुत्राला दिले. असे बाळासाहेबांनी कधी केले नाही. त्यांच्यासोबत जे नेते होते त्यांना संपवण्याचं कामं उद्धव ठाकरे यांनी केले आहे, म्हणून एकनाथ शिंदे यांचा पर्याय स्वीकाराला असल्याचे कदम यांनी सांगितले.

ते म्हणाले, लोकसभा आणि विधानसभा आम्ही जिंकूच, आम्ही आणखी मेहनत घेऊ. जिथं ठाकरे यांची सभा होईल तिथे दुसऱ्या दिवशी माझी सभा होईल, असे आव्हान कदम यांनी उद्धव ठाकरे यांना दिले आणि शिवसेनाप्रमुखांचे स्वप्न आम्ही साकार करू, असे सांगितले. उद्धव ठाकरे यांना ईडी लावली पाहिजे, म्हणजे भ्रष्टाचार बाहेर येईल, असेही कदम यांनी म्हटले आहे.

मातोश्रीवर खोक्यांचा पाऊस...

मातोश्रीवर खोक्यांचा पाऊस पाडवा लागतो तरच मंत्रिपद मिळते, असा आरोप कदम यांनी ठाकरेंवर केला तर आम्ही मिठाई आणि पुष्कळ खोके त्यांना दिले असल्याचे कदम यांनी सांगितले. उद्धव ठाकरेंच्या गटातील आमदार आमच्यासोबत येतील, असा विश्वास आम्हाला आहे. आता मला आमदारकी आणि खासदारकी नको, मला शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांनी खूप काही दिल आहे, मी त्यात समाधानी असल्याचे कदम यांनी म्हटले.

शिवसेनाप्रमुखांचे मत...

राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा धुमसत आहे. मराठा समाज आक्रमक झाला आहे, तर मनोज जरांगे पुन्हा एकदा गेल्या सात दिवसांपासून आमरण उपोषणास बसले आहेत. त्यांची प्रकृतीही बिघडली आहे. दरम्यान, मराठा आरक्षणावर बोलताना रामदास कदम म्हणाले, ज्यांचे पोट रिकामे आहे, त्याला आरक्षण द्या हेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांचे मत आहेत. ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करत आहेत. मराठ्यांना कायमचे आणि कायद्यात टिकेल, असे आरक्षण मुख्यमंत्री देतील, असेही कदम यांनी सांगितले.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT