Ramesh Kadam sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Solapur Loksabha : रमेश कदम यांची निवडणुकीतून माघार? 'एमआयएम'कडून प्रतिसाद नाही...

Loksabha Election : काही दिवसांपूर्वी एमआयएमच्या नेत्यांशी उमेदवारी संदर्भात रमेश कदम यांची चर्चा झाली होती. मात्र एमआयएम आणि रमेश कदम यांच्यातील चर्चा अद्याप ही पूर्ण झालेली नाही.

सरकारनामा ब्यूरो

Solapur Political News : सोलापूर मतदारसंघात रमेश कदम हे एमआयएमकडून अर्ज दाखल करणार असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे सोलापूर मतदारसंघात चौरंगी लढत होण्याची शक्यता होती. काँग्रेस, भाजप, वंचित, एमआयएम यांच्यात लढत होण्याची शक्यता असताना रामदास कदम हे आपली उमेदवारी मागे घेण्याची शक्यता आहे.

काही दिवसांपूर्वी एमआयएमच्या नेत्यांशी उमेदवारी संदर्भात रमेश कदम (Ramesh Kadam) यांची चर्चा झाली होती. मात्र एमआयएम आणि रमेश कदम यांच्यातील चर्चा अद्याप ही पूर्ण झालेली नाही. त्यातच "उमेदवारीसंदर्भात एमआयएमकडून अद्याप कोणताही प्रतिसाद नाही. 28 एप्रिलला सभा घेऊन आपली राजकीय भूमिका जाहीर करू", असे रामदास कदमांनी सांगितले. त्यामुळे रामदास कदम माघार घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सोलापूर लोकससभेसाठी (Solapur Loksabha) अर्ज दाखल करण्यासाठी 19 एप्रिल पर्यंतची मुदत आहे. तर, रामदास कदम 28 एप्रिलाल सभा घेत आपली भूमिका जाहीर करणार आहेत. त्यात कदम यांना एमआयएमकडून उमेदवारी संदर्भात कोणताही प्रतिसाद आलेला नाही. त्यामुळे ते कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

कदम म्हणाले, "एमआयएमने त्यांच्या वरिष्ठांशी चर्चा करून ही निवडणूक मी लढवावी अशी इच्छा माझ्याकडे व्यक्त केली होती. मी 8 वर्ष कथित घोटाळ्याच्या आरोपत तुरुंगात होतो, ही गोष्ट देखील तुम्ही लक्षात घ्या असे मी त्यांना म्हणालो होतो. मला देखील माझ्या कार्यकर्त्यांशी आणि माझ्याशी संपर्कात असलेल्या सर्वपक्षीय वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करायची आहे, म्हणून मी वेळ घेतला होता"

"28 एप्रिल रोजी मी मोहोळमध्ये सभा घेणार आहे. तिथेच मी पुढची राजकीय भूमिका जाहीर करेन. एमआयएमकडून अद्याप कोणताही प्रतिसाद आलेला नाही. माझं देखील कार्यकर्त्यांशी बोलणं सुरु आहे.उमेदवारी संदर्भात निर्णय घेऊन मला कळवा मी चार दिवसात निरोप देईन असे त्यांना सांगितलं होतं", असे रमेश कदम म्हणाले.

(Edited By Roshan More)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT