Solapur Loksabha 2024 : फडणवीस, सातपुतेंची अडचण वाढणार?; काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे तक्रार

Congress Complaint to Election Commission : काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून आचारसंहिता भंगाची तक्रार केली आहे. त्यात पत्रात लोंढे यांनी गृहमंत्री फडणवीस यांची पदावरून तत्काळ हकालपट्टी करावी, अशी मागणी केली आहे. त्यावर आयोग काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.
Congress Complaint to Election Commission
Congress Complaint to Election CommissionSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 2 April : सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार तथा आमदार राम सातपुते यांनी मोची समाजाचा प्रश्न फोनवरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मांडला. त्यावर फडणवीस यांनी गुन्हे मागे घेण्याबाबतचे आश्वासन दिले, त्यामुळे फडणवीस आणि सातपुते अडचणीत येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. कारण काँग्रेसने हे आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन आहे, असे सांगून निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे.

काँग्रेसचे (Congress) मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी निवडणूक आयोगाला (Election Commission) पत्र लिहून आचारसंहिता भंगाची तक्रार केली आहे. त्यात पत्रात लोंढे यांनी गृहमंत्री फडणवीस (Devendra Fadnavis) यांची पदावरून तत्काळ हकालपट्टी करावी, अशी मागणी केली आहे. त्यावर आयोग काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Congress Complaint to Election Commission
Hatkanangle Lok Sabha Constituency : धैर्यशील माने-राजू शेट्टी यांच्या लढतीत ‘वंचित’ची उडी; ठाकरे गटाचा सस्पेन्स कायम

पत्रात लोंढे यांनी म्हटले आहे की, आमदार राम सातपुते (Ram Satpute) यांनी प्रचाराच्या एका बैठकीत मोची समाजावर कोविड काळात दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याबाबतची विनंती गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करून केली होती. त्यावर बोलताना गृहमंत्री फडणवीस यांनी संबंधित तरुणांवरील गुन्हे मागे घेण्याबाबतचे आश्वासन दिले होते. तसेच, चिंता कारण्याचे काही कारण नाही, असे उपस्थितांना सांगितले हेाते.

आदर्श आचारसंहिता लागू असताना मतदारांना प्रलोभन दाखवणे, आश्वासन देणे हा आचारसंहितेचा भंग आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्य सरकारच्या समितीने शिफारस केल्याशिवाय हे गुन्हे मागे घेता येत नाहीत. तरीही मतदारांना प्रलोभन दाखवण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन देऊन मतदारांची दिशाभूल केलेली आहे, असा दावा लोंढे यांनी पत्रात केला आहे.

Congress Complaint to Election Commission
Lok Sabha Election 2024 : शिवसेनेचे दोन उमेदवार बदलण्यासाठी भाजपचा मुख्यमंत्र्यांवर दबाव; शिंदे शब्द पाळणार की उमेदवार बदलणार?

दरम्यान, मोची समाजातील व्यक्तींवरील गुन्हे आजपर्यंत मागे का घेतले नाहीत? या गुन्ह्यांची आठवण यांना निवडणुकीतच कशी झाली? गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन देण्यासाठी देवेंद्र फडणवीस निवडणुकीचा वाट पाहत होते काय? असे प्रश्न काँग्रेसने निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रात विचारले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या गृहमंत्रिपदाचा गैरवापर केला आहे, त्यामुळे त्यांना गृहमंत्रिपदावरून तत्काळ हटवावे. तसेच, राम सातपुते यांची सोलापूरची भाजपची उमेदवारी रद्द करण्यात यावी, अशी तक्रार काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे केली आहे.

R

Congress Complaint to Election Commission
Dispute In Mahayuti : नाशिकमध्ये छगन भुजबळांची उमेदवारी निश्चित; खासदार हेमंत गोडसे बंडखोरीच्या तयारीत?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com