Solapur Politics : पवार-शिंदे, मोहिते पाटलांमध्ये ‘शिवरत्न’वर खलबतं; धनाजी साठे, नारायण पाटलांचीही हजेरी

Lok sabha Election 2024 : माढा, सोलापूर आणि बारामती लोकसभा मतदारसंघाची रणनीती ठरविण्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे हे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या ‘शिवरत्न’ या निवासस्थानी दाखल झाले आहेत.
Sharad Pawar-Sushilkumar Shinde
Sharad Pawar-Sushilkumar ShindeSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 14 April : माढा, सोलापूर आणि बारामती लोकसभा मतदारसंघाची रणनीती ठरविण्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे हे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या ‘शिवरत्न’ या निवासस्थानी दाखल झाले आहेत. धैर्यशील मोहिते पाटील यांचा राष्ट्रवादी प्रवेश आणि या तीन मतदारसंघातील स्ट्रॅटेजीबाबत सध्या या दिग्गज नेत्यांमध्ये चर्चा सुरू आहे. ‘स्नेह भोजना’नंतर ते माध्यमांशी बोलणार का, याची उत्सुकता सोलापूर जिल्ह्याला आहे.

दरम्यान, या दिग्गज नेत्यांसोबत सोलापूर जिल्ह्यातील माढ्याचे माजी आमदार धनाजीराव साठे, करमाळ्याचे माजी आमदार नारायण पाटील, काँग्रेसचे सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे, शहराध्यक्ष चेतन नरोटे हेही या स्नेह भोजनाला उपस्थित आहेत. संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड हे शरद पवार यांच्यासोबत आले आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Sharad Pawar-Sushilkumar Shinde
Madha Lok Sabha : ‘कालपर्यंत RSSचा प्रचार करणारे आज गांधीवादी कसे झाले?’ अभयसिंह जगतापांचा राष्ट्रवादीला खडा सवाल

माढ्यातून उमेदवारीमध्ये डावलण्यात आल्यानंतर धैर्यशील मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून (NCP) निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत आज सायंकाळी चार वाजता धैर्यशील यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होणार आहे. तत्पूर्वी मोहिते पाटील यांनी पवार-शिंदे यांच्यासाठी शिवरत्नवर स्नेह भोजनाचे आयोजन केले आहे.

शरद पवार (Sharad Pawar), सुशीलकुमार शिंदे (sushilkumar Shinde) यांचे धैर्यशील मोहिते पाटील यांनी शिवरत्नवर स्वागत केले. त्यानंतर हे सर्व नेते विजयसिंह मोहिते पाटील व इतर सदस्यांसमावेत चर्चा करीत आहेत. मोहिते पाटील गटाची सोलापूर, माढा मतदारसंघात ताकद आहेत. याशिवाय बारामतीत मोहिते पाटील यांचे नातेवाईक आहेत. त्यामुळे मोहिते पाटील यांचा राष्ट्रवादीत होणारा प्रवेश या तीन मतदारसंघात नक्कीच परिणाम करणारा ठरणार आहे.

Sharad Pawar-Sushilkumar Shinde
Mohite Patil's Dinner Diplomacy : मोहिते पाटलांची पवार, शिंदेंसोबत 'डिनर डिप्लोमसी'; सोलापूर, माढ्याची रणनीती ‘शिवरत्न’वर ठरणार

सोलापूर लोकसभा मतदारसंघात मोहिते पाटील यांची ताकद निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. माळशिरस विधानसभेला मागील निवडणुकीत भाजपकडून मोहिते पाटील यांच्या इच्छेविरुद्ध उमेदवार देण्यात आला होता. त्यात राम सातपुते यांनी माळशिरसमध्ये उभे केलेले भाजपचे नेटवर्क याचे उट्टे मोहिते पाटील सोलापूरमध्ये काढू शकतात, त्यामुळे सुशीलकुमार शिंदे यांच्यासाठी ही डिनर डिप्लोमसी अधिक फायदेशीर ठरणार आहे.

काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे हे २००९ नंतर निवडणुकीच्या निमित्ताने प्रथमच ‘शिवरत्न’वर आले आहेत. विजयसिंह मोहिते पाटील हे शिंदे यांच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री होते. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकाच जिल्ह्यातील असण्याची महाराष्ट्राच्या राजकारणातील ती पहिली वेळ होती.

Sharad Pawar-Sushilkumar Shinde
Mohite Patil-Jankar : कट्टर विरोधक एकत्र येण्याची शक्यता!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com