Swabhimani Sanghatna Andolan sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Swabhimani Protest : 'स्वाभिमानी'चा जरंडेश्वर कारखान्यावरही हल्लाबोल; अजित पवारांच्या भूमिकेकडे लक्ष

Umesh Bambare-Patil

Swabhimani Protest : वारंवार विनंती आणि निवेदन देऊनही साखर कारखानदार ऊसदराबाबत निर्णय घेण्यास तयार नसल्यामुळे आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जरंडेश्वर साखर कारखान्यावर ऊस वाहतूक रोखली. त्यामुळे आता उपमुख्यमंत्री अजित पवार कारखान्याच्या व्यवस्थापनाला काय सूचना करणार याची उत्सुकता आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने Swabhimani Shetkari Sanghatna उसाला यंदाच्या गाळपामध्ये पहिली उचल साडेतीन हजार रुपये द्या आणि गेल्या हंगामातील पाचशे रुपये द्या, या मागणीसाठी सातत्याने आंदोलने चालू केली आहेत. सातारा जिल्ह्यातील सर्वच कारखानदार उसदराची Sugarcane FRP कोंडी फोडण्यासाठी एकमेकांकडे बोट दाखवत असल्यामुळे संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.

आज जरंडेश्वर साखर कारखान्याची ऊस वाहतूक स्वाभिमानी शेतकरी संघटनेने रोखली. रस्ता रोको होऊ नये यासाठी पोलिस प्रशासन आणि कारखाना व्यवस्थापन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी यांच्याबरोबर चर्चा करत होते. मात्र, स्वाभिमानीचे पदाधिकारी ऐकायला तयार नव्हते. आंदोलन होऊ नये म्हणून घेतलेली बैठक निष्फळ झाल्यानंतर स्वाभिमानी पदाधिकाऱ्यांनी कायद्याच्या चौकटीत राहूनच जरंडेश्वर साखर कारखान्याची ऊस वाहतूक रोखली. Maharashatra Political News

स्वाभिमानीचे पदाधिकारी यांनी वाहन चालकांना विनंती करून ऊस वाहतुकीची वाहने एका बाजूला लावायला सांगितले. या विनंतीला मान देऊन वाहनधारकांनी रस्त्याच्या एका बाजूला वाहने लावली. त्यामुळे वाहनाच्या लांबच्या लांब रांगा लागल्या. परिणामी ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या तब्बल सात किलोमीटर रांगा लागल्या. पोलिस प्रशासनाने विनंती केल्यानंतर कारखाना व्यवस्थापनातील अधिकारी चर्चेला आले. त्यांनी 30 नोव्हेंबरला पहिल्या हप्त्याच्या रूपाने ऊसबील शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला.

या आंदाोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य प्रवक्ते अनिल पवार, जिल्हाध्यक्ष राजू शेळके, प्रदेश सरचिटणीस सूर्यभान जाधव-पाटील, राज्य कार्यकारिणी सदस्य सूर्यकांत भुजबळ, पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत लावंड, कोरेगाव तालुकाध्यक्ष जीवन शिर्के, अर्जुन साळुंखे, दत्तुकाका घार्गे, सुभाष जाधव, विविध गावचे पदाधिकारी आणि शेतकरी उपस्थित होते.

Edited By : Umesh Bambare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT