Sugarcane FRP News : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कराड दौऱ्यात काळे झेंडे दाखवून ऊसदर जाहीर करा, मगच कृषी प्रदर्शनाचे उदघाटन करा, असा इशारा बळीराजा शेतकरी संघटनेकडून देण्यात आला आहे. तसेच प्रदर्शनाला खासदार, आमदार व अन्य लोकप्रतिनिधींनाही जाऊ देणार नसल्याचेही सांगण्यात आले आहे.
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री ज्येष्ठ नेते कै. यशवंतराव चव्हाण Yashvantrao Chavan यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून त्यांच्या कराड (जि. सातारा) येथील समाधीस्थळी अभिवादन करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Eknath Shinde येणार आहेत. तसेच त्यांच्या हस्ते कराड शेती उत्पन्न बाजार समितीतर्फे आयोजित केलेल्या यशवंतराव चव्हाण कृषी प्रदर्शनाचे उदघाटनही होणार आहे.
या दौऱ्यात बळीराजा शेतकरी संघटना मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवून ऊसदर जाहीर करा, मगच कृषी प्रदर्शनाला जावा, असा इशारा देणार असल्याचे बळीराजा शेतकरी संघटनेकडून सांगण्यात आले आहे. बळीराजा शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष पंजाबराव पाटील म्हणाले, ऊसदर जाहीर करून साखर कारखाने सुरू करावे, असे साखर आयुक्त कार्यालयाने साखर कारखान्यांना कळवले आहे.
मात्र, अपवाद वगळता कोणत्याही कारखान्याने ऊसदर जाहीर केलेला नाही. ही शेतकऱ्यांची लूटच आहे. मुख्यमंत्री शिंदे हे यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी अभिवादनासाठी आणि कृषी प्रदर्शनाच्या उदघाटनास येणार आहेत. Maharashtra Political News
या प्रदर्शनाला खासदार, आमदार व अन्य लोकप्रतिनिधींनीही जाऊ नये, अशी बळीराजा शेतकरी संघटनेची भूमिका आहे. जर आम्हाला प्रशासनाकडून विरोध करण्यात आला तर संघटनेतर्फे काळे झेंडे दाखवून गनिमी काव्याने आंदोलन केले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
Edited By : Umesh Bambare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.