Solapur Hindu Akrosh Morcha Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Solapur Hindu Akrosh Morcha : महाराष्ट्र के ‘सीएम’ने ‘योगीजी’के ॲंगलसे कारवाई करनी चाहिए; दगडफेकीवर टी. राजांचा सल्ला

Vijaykumar Dudhale

Solapur News : वक्फ बोर्डाच्या संदर्भात महाराष्ट्र सरकार काय कार्यवाही करत आहे, याबाबत मला माहिती नाही. पण, जो कोणी लव्ह जिहाद आणि दगडफेकीसारखे प्रकार करत असतील तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी ‘योगी आदित्यनाथ’ यांच्या ॲंगलने कारवाई करावी, म्हणजे भविष्यात अशा प्रकारची दगडफेकीसारखी घटना होणार नाही, असा सल्ला तेलंगणाचे भाजपचे आमदार टी. राजा सिंह यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना दिला आहे. (T. Rajasinh's reaction on Stone pelting in Hindu Akrosh Morcha at solapur)

सोलापुरात शनिवारी (ता. 6 जानेवारी) हिंदु आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. त्या मोर्चादरम्यान दगडफेकीची घटना घडली होती. त्यावर बोलताना आमदार टी. राजासिंह यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या पद्धतीने अशी दगडफेक करणाऱ्यावंर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आमदार टी. राजा म्हणाले की, सोलापुरात शनिवारी शांतेत हिंदू जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. त्यात हजारोंच्या संख्येने रामभक्त सहभागी झाले होते. वक्फ बोर्डावर एक कायदा करावा. वक्फ बोर्डाच्या जमिनीवर लॅंड जिहादच्या माध्यमातून कब्जा केला जात आहे. वक्फ बोर्डाची जमीन असल्याचे सांगून एक वस्ती नोटीस देऊन हटविण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याविरोधात हा मोर्चा होता. हा मोर्चा अत्यंत शांततेत चालला होता. मात्र, तीन ते चार वस्तींमधून एकाकी दगडफेक सुरू झाली. त्यात काही कार्यकर्त्यांची डोकी फोडली. पोलिसांनी तातडीने पाऊले उचलून हा प्रकार रोखला आणि काही लोकांना अटकही करण्यात आली आहे.

सोलापुरात झालेली दगडफेक ही एक पूर्वनियोजित घटना होती. हे लोक घरावर बसून दगडफेक करत होते, असा आरोप आमदार टी. राजा सिंह यांनी केला. पोलिसांनाही या दगडफेकीचा अंदाज आला नसावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.

टी. राजा म्हणाले की, सोलापूरच्या सभेत आम्ही कोणतेही प्रक्षोभक विधान केलेले नाही. आमचा सोलापुरात हा तिसरा मोर्चा होता. असा प्रकार मागील दोन वेळा घडलेला नाही. मागणी करणे हे प्रत्येकाचा अधिकार आहे. पण, वक्फ बोर्डाचा महाराष्ट्रात जो अत्याचार चालू आहे. त्याविरोधात हा मोर्चा काढण्यात आलेला होता.

वक्फ बोर्डाचा विषय मुख्यमंत्र्यांपर्यंत नेण्यात यावा, अशी सूचना मी आमदार नीतेश राणे यांनाही केली आहे. ते हा विषय मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात पोचवतील, असा विश्वास मला आहे. तसेच, दगडफेकीनंतर झालेल्या तोडफोडीबाबत मात्र आमदार टी. राजा सिंह यांनी हात वर केले. मी मोर्चाच्या सुरुवातीला होता. दगडफेक झाल्याचे आम्ही पाहिले. मात्र, पाठीमागे काय घडले, याबाबत मला माहिती नाही, असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, मोर्चादरम्यान मधला मारुती चौकात दगडफेक आणि तोडफोड झाली होती. या प्रकरणी शनिवारी एक गुन्हा दाखल करण्यात आला होता. मोर्चानंतर झालेल्या सभेत प्रक्षोभक वक्तव्य केल्याबद्दल तेलंगाणातील भाजपचे आमदार टी राजा सिंह आणि आमदार नीतेश राणे यांच्यावर सोलापुरात गुन्हा दाखल झाला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT