Solapur Congress : काँग्रेसमध्ये पुन्हा लेटरबॉम्ब; ‘वरिष्ठ उपाध्यक्षांची ढवळाढवळ थांबवा’

Congress Dispute News : सुरेश हसापुरे सोलापूर शहरातील कामात वारंवार ढवळाढवळ करीत आहेत.
Solapur Congress News
Solapur Congress NewsSarkarnama
Published on
Updated on

Solapur News : सोलापूर काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा लेटरबॉम्ब फुटला असून पक्षाचे वरिष्ठ जिल्हा उपाध्यक्ष सुरेश हसापुरे यांनी शहरातील कामकाजात ढवळाढवळ करू नये, असा इशारा युवक काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष अंबादास करगुळे यांनी दिला आहे. करगुळे यांनी थेट माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना पत्र लिहिले आहे. (Stop Suresh Hasapure's interference in Solapur City Congress: Kargule)

सोलापूर जिल्ह्यात काँग्रेसची ताकद उणीपुरी असतानाही पक्षातील गटबाजी मात्र थांबण्याचे काही केल्या नाव घेत नाही. काही दिवसांपूर्वी खासदार राहुल गांधी यांची नागपूर येथे सभा झाली. त्या सभेकडे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते-पाटील यांनी पाठ फिरवली होती. त्याची जिल्ह्यात चर्चा रंगलेली असतानाच आता सोलापूर शहरातील गटबाजीने पुन्हा एकदा उचल खाल्ली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Solapur Congress News
Bhujbal Pandharpur Tour : अजितदादा गटातील मराठा नेत्यांना जरांगेंचा धसका; भुजबळांकडे फिरवली पाठ!

सोलापूरचे काँग्रेसचे माजी युवक शहराध्यक्ष अंबादास करगुळे यांनी सुशीलकुमार शिंदे आणि आमदार प्रणिती शिंदे यांना पत्र लिहून हसापुरे यांचा सोलापूर शहरातील कामकाजात होत असलेला हस्तक्षेप थांबवण्याची मागणी केली आहे. करगुळे यांनी पत्रात म्हटले आहे की, काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष सुरेश हसापुरे हे जिल्ह्यात पक्ष-संघटना मजबूत करण्याऐवजी शहरातील काँग्रेसच्या कामात दखल देत आहेत, त्यांच्या वाढत्या हस्तक्षेपामुळे शहरातील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मनात खदखद आहे.

वास्तविक हसापुरे यांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघातील दक्षिण सोलापूर, मोहोळ, अक्कलकोट, पंढरपूर आणि मंगळवेढा या तालुक्यांत पक्षवाढीसाठी लक्ष देणे गरजेचे असताना ते शहरातील कामात वारंवार ढवळाढवळ करीत आहेत. लोकसभेची निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आलेली असताना हसापुरे यांनी शहरातील काँग्रेसच्या कामात दखल देण्याऐवजी प्रणिती शिंदे यांना खासदार म्हणून निवडून आणण्यासाठी पक्ष बांधणी गरजेचे करणे गरजेचे आहे. मात्र, ते त्याकडे दुर्लक्ष करून शहरात वारंवार लक्ष घालत आहेत, असेही करगुळे यांनी नमूद केले आहे.

Solapur Congress News
Solapur Politics : ‘आंबेडकरांना महाआघाडीत घ्यावं; पण त्यांचं सर्वच ऐकलं...’ : सुशीलकुमारांचे मुद्यावर बोट

करगुळे म्हणाले की, सुरेश हसापुरे यांच्या कामकाजात वारंवार हस्तक्षेप करण्याच्या भूमिकेमुळे शहरातील जुने निष्ठावंत पदाधिकारी नाराज झाले आहेत. ते आपली व्यथा बोलून दाखवत नाहीत. मात्र, शहरातील काँग्रेस वर्तुळात त्याची दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे.

Solapur Congress News
BJP-MNS Alliance : भाजप-मनसेची अनोखी युती; भाजप माजी आमदारांची कन्या होणार राजू पाटलांची सून

सुशीलकुमार शिंदे आणि आमदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना कामाचे वाटप करून द्यावे. शहरातील कार्यकर्त्यांकडे सोलापुरातीलच काम द्यावे. जिल्ह्यातील कार्यकर्त्यांकडे ग्रामीण भागातील पक्षाचे काम देण्यात यावे, अशी मागणी मी काँग्रेसचा सच्चा कार्यकर्ता म्हणून पक्षाकडे करीत आहे, असेही करगुळे यांनी पत्रात म्हटले आहे.

Edited By : Vijay Dudhale

R...

Solapur Congress News
Pandharpur Obc Melava : मंत्री बंत्री मी नंतर अगोदर ओबीसी कार्यकर्ता; छगन भुजबळांचा पंढरीतून इशारा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com