Sangali Marathi Natyasammelan sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sangali News : नाट्य संमेलनात मंत्री सुधीर मुनगंटीवारांची मोठी घोषणा; म्हणाले,"नवी नाट्यगृहे..."

Sudhir Mungantiwar विष्णुदास भावे नाट्य मंदिरात अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे 100 वे मराठी नाट्य संमेलनाची मुहूर्तमेढ राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याहस्ते झाले.

Umesh Bambare-Patil

Sangali News : सांगलीत शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचा मुहूर्तमेढ सोहळा सकाळी दहा वाजता आयोजित केला होता. मुहूर्तमेढ कार्यक्रमाच्या निमित्ताने आकर्षक घंटा तयार करण्यात आली होती. त्याचे उद्घाटन नाट्य परिषद मध्यवर्ती शाखेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांच्या हस्ते घंटानाद करुन झाले. दामले यांनी अत्यंत सफाईदारपणे घंटानाद केला परंतु अचानक घंटा तुटून रंगमंचावर पडली. याप्रकाराने दामलेंसह व्यासपीठावरील सर्वचजण अचंबित झाले. सुदैवाने घंटा कोणाला लागली नाही.

विष्णुदास भावे नाट्य मंदिरात अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे 100 वे मराठी नाट्य संमेलनाची मुहूर्तमेढ राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार Sudhir Mungantiwar यांच्याहस्ते 99 व्या नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी, नियोजित 100 व्या नाट्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. जब्बार पटेल, जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे Suresh Khade, खासदार संजयकाका पाटील, नाट्य परिषदेचे अध्यक्ष व अभिनेते प्रशांत दामले, संमेलनाचे स्वागताध्यक्ष व आमदार सुधीर गाडगीळ यांच्या उपस्थितीत झाले.

मंत्री मुनगंटीवार म्हणाले, नाट्य क्षेत्रातील दिशा सकारात्मक हवी, यासाठी 100 व्या नाट्य संमेलनाच्या निमित्ताने चिंतन आणि चर्चा व्हायला पाहिजे. प्रशांत दामले यांचे एकसारखे 12 हजार प्रयोग झाले, परंतु नाटक पाहायला येणार्‍यांची संख्या कमी होत आहे. परंतु जोपर्यंत दर्दी लोक आहेत, तोपर्यंत नाटकावर वाईट दिवस कधीच येवू शकत नाहीत. .

राज्यात नव्याने 75 नाट्यगृह उभारण्यास सरकारने मंजुरी दिली आहे, परंतु नाट्यगृहाचे भाडे परवडत असल्याच्या तक्रारी आहेत. नवी नाट्यगृहे सोलर यंत्रणेवर चालवून अल्पदरात उपलब्ध करुन दिली जातील. नाट्यगृहाची दयनीय अवस्था दूर करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नगरविकास विभागही सरसावला आहे

मुख्यमंत्री, सांस्कृतिक मंत्री नाट्यवेडे - प्रशांत दामले

आमच्या पाठीमागे मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री, सांस्कृतिक मंत्री आहेत. सर्व राजकारणी हे नाट्यवेडे आहेत, त्यामुळे नाट्य संमेलनास भरघोस मदत हात आखडता घेतला जात नसल्याचे नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी सांगत नेत्यांची स्तुती केली. मागील 40 वर्षात इतक्या पद्धतीची नाट्यगृह पहिली आहेत. त्यांचा दुरुस्ती न झाल्याने ते अडगळीत पडले आहेत. जे बांधले आहेत. त्याचे पहिली दुरुस्ती करावी.

नाट्य संमेलनास 10 लाख.. सुरेश खाडे

सांगलीला नाट्य पांढरी, आरोग्य पांढरी आणि पुढार्‍यांची पांढरी म्हंटले जाते. टीव्ही च्या जमान्यात नाटकांची क्रेझ कमी झाली आहे. जुन्या काळात अतिशय चांगले नाटक व्हायचे. नाट्य संमेलनाला पुण्यातून निधी मिळाला पण ते अर्थ मंत्री आहेत आम्ही कामगार मंत्री आहे कोठे तरी सेटलमेंट व्हायला पाहिजे. म्हणून जिल्हा नियोजनमधून दहा लाखांचा निधी देत असल्याचे जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी जाहीर केले.

मुहूर्तमेढ वेळ हुकली

शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचा मुहूर्तमेढ सोहळा सकाळी 10 वाजता आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमास राजकीय नेतेमंडळींची मांदियाळी असल्यामुळे निदान मुहुर्तमेढ वेळेत होणार का, असा प्रश्न होता. स्वागताध्यक्षांसह सुधीर गाडगीळ सकाळी 10 वाजता कार्यक्रमस्थळी हजर होते. मात्र सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मध्यवर्ती शाखेचे अध्यक्ष प्रशांत दामले उशीरा आले. साहजिकच मुहूर्तमेढीची सकाळची वेळ हुकल्याने दुपारी दीडनंतर हा कार्यक्रम सुरु झाला. 

स्वागताध्यक्ष आमदार सुधीर गाडगीळ यांनी नाटकाची अलौकिक परंपरा सांगलीत जपली आहे. शहराचा वाढता विस्तार पाहता नवीन नाट्यगृह बांधण्यासाठी सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी योगदान दिल्याचे सांगितले. प्रास्तविक मुकुंद पटवर्धन यांनी करताना शंभराव्या नाट्य संमेलनाच्या निमित्ताने नवी दिशा, विचार आणि नजर मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.या कार्यक्रमास अभिनेते विजय गोखले, चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, साहित्य परिषदेचे अध्यक्ष मिलींद जोशी, भाऊसाहेब भोईर, अजित भुरे, सतिश लोटके, विजय चौगुले यांच्यासह नाट्य रसिक उपस्थित होते.

Edited By : Umesh Bambare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT