Manoj Jarange Patil sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satara Maratha Reservation : कुणबी शब्दाची लाज वाटते; शेती विकून चंद्रावर जावा...जरांगे पाटलांचा सल्ला

Jarange patil मराठ्यांची राजधानी असलेल्या साताऱ्यातील गांधी मैदानावर आज मनोज जरांगे पाटील यांची तोफ धडाडली.

Umesh Bambare-Patil

-आनंद सुरवसे

Maratha Reservation News : आपल्याला ओबीसीमधूनच आरक्षण पाहिजे आहे. मग कुणबी म्हणून घ्यायला लाज वाटायची कारण काय. शेती करणे म्हणजे कुणबी. ज्याला कुणबी शब्दाची लाज वाटते त्याने शेती विकून चंद्रावर जावे, असा सल्ला मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी साताऱ्यातील सभेत दिला.

मराठ्यांची राजधानी असलेल्या साताऱ्यातील Satara गांधी मैदानावर आज मनोज जरांगे पाटील Jarange Patil यांची तोफ धडाडली. त्यांनी शिंदे, फडणवीस सरकारवर टीकेची झोड उठवली. तसेच मराठा समाजातील काहींना कुणबी म्हणून घेण्यास लाज वाटते त्यांचेही कान धरले.

Manoj Jarange Maharashtra Tour

जरांगे पाटील म्हणाले, सातारा जिल्ह्यात प्रत्येक गावात साखळी उपोषण सुरू करा. सरकारला निवेदन द्या, कोणालाही भिऊ नका. फक्त शांततेत आंदोलन करा.काही जणांना कुणबी नको असे मत आहे. पण, आपल्याला ओबीसीमधूनच आरक्षण पाहिजे आहे. मग कुणबी का नको.

शेती करणे म्हणजे कुणबी होय. ज्याला कुणबी शब्दाची लाज वाटते त्याने शेती विकून चंद्रावर जावे. आहेत त्यात काय लाज वाटते, असा प्रश्न त्यांनी केला. मी प्रांतीय भेदभाव करत नाही. मराठवाडा, कोकण, पश्चिम महाराष्ट्र असा भेद करणार नाही. Maharashtra Political News

२४ डिसेंबरला सरसकट आरक्षण देण्याचे शासनाने आश्वासन दिले म्हणून उपोषण मागे घेतले. पण आता मराठा समाजाने सावध राहावे. माझा जीव गेला तरी मी आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही, असे त्यांनी सांगितले. तसेच गावागावात साखळी उपोषण सुरु करण्याचा सकल मराठा समाजाला सल्ला दिला.

Edited By : Umesh Bambare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT