Udayanraje Bhosle-Sharad Pawar  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satara Politic's : ...अन्‌ दुरावलेल्या उदयनराजेंनी शरद पवारांचे पुष्पगुच्छ देऊन केले विशेष स्वागत!

Udayanraje Bhosle-Sharad Pawar News : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील बहुतांश नेत्यांचा उदयनराजे भोसले यांच्या उमेदवारीला विरोध असूनही पवार हे कोणाचेही न ऐकता उदयनराजे यांना लोकसभेचे तिकिट देत असत. पक्षातील अनेक नेत्यांशी उदयनराजेंचा झगडा असायचा.

Vijaykumar Dudhale

Satara, 05 July : सातारा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला होता, विशेषतः शरद पवारांच्या विचाराला मानणारा जिल्हा होता, म्हणूनच सातारकरांनी 2019 च्या लोकसभा पोटनिवडणुकीत थेट छत्रपती घराण्याचे वंशज उदयनराजेंना नाकारून पवारांच्या विचाराचे श्रीनिवास पाटील यांना लोकसभेत धाडले होते. मात्र, राष्ट्रवादीत असताना उदयनराजे भोसले हे पवारांचे लाडके होते. पण, हेच लाडके उदयनराजे 2019 मध्ये पवारांपासून दुरावले आहेत. तेव्हापासून उदयनराजे आणि पवार हे एक दोन वेळचा एकत्र आले असावेत. पण, कऱ्हाडमध्ये एकत्र आलेले उदयनराजेंनी पवारांना अगोदर नमस्कार केला आणि त्यानंतर पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील (Balasaheb Patil) यांचे चिरंजीव जशराज यांच्या विवाह सोहळ्याला सातारा जिल्ह्यातील बहुतांश नेतेमंडळींनी उपस्थिती लावून नवदांपत्यास शुभेच्छा दिल्या. विवाह सोहळ्याला ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वराज चव्हाण, खासदार उदयनराजे भोसले, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, आमदार शशिकांत शिंदे यांच्यासह प्रमुख नेतेमंडळींचा समावेश होता.

शरद पवार (Sharad Pawar) हे लग्न सोहळ्यासाठी अगोदर येऊन बसले होते. त्यांच्यानंतर खासदार उदयनराजे भोसले हे आले. त्यांनी प्रथम शरद पवारांना नमस्कार केला आणि त्यानंतर पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्याची चर्चा साताऱ्यात रंगली होती. राष्ट्रवादीत असताना उदयनराजे भोसले हे शरद पवारांचे लाडके खासदार होते. ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ चिन्हावर तीन वेळा निवडून आले होते.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील बहुतांश नेत्यांचा उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosle) यांच्या उमेदवारीला विरोध असूनही पवार हे कोणाचेही न ऐकता उदयनराजे यांना लोकसभेचे तिकिट देत असत. पक्षातील अनेक नेत्यांशी उदयनराजेंचा झगडा असायचा. त्यात फलटणचे रामराजे नाईक निंबाळकर यांच्याशी तर त्यांचा साताऱ्याच्या ‘रेस्ट हॉऊस’मध्येच जोरदार वाद झाला होता.

तत्कालीन प्रदेशाध्यक्षांनी उदयनराजेंच्या उमेदवारीसंदर्भात नकारात्मक भूमिका घेतली होती. पण पवारांनी 2019 च्या निवडणुकीतही उदयनराजेंना तिकिट दिले होते. खुद्द शरद पवारांनी एक सभेत मी साताऱ्यात निर्णय घ्यायला (उमेदवारीसंदर्भात) चुकलो, असे म्हटले होते.

लोकसभेच्या 2019च्या निवडणुकीत उदयनराजे यांनी विजय मिळविला खरा. पण, केंद्रात भाजपची सत्ता येताच त्यांनी अवघ्या काही महिन्यांतच भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. भाजपनेही पोटनिवडणुकीत त्यांनाच तिकिट दिले. त्या पोटनिवडणुकीत शरद पवारांची जादू चालली आणि उदयनराजेंचा पराभव झाला. तेव्हापासून उदयनराजे आणि पवार यांच्या दुरावा होता.

तेव्हापासून उदयनराजे हे पवारांवर टीकास्त्र सोडत होते. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरूनही त्यांनी पवारांना जबाबदार धरले होते. असे असले तरी आरक्षणाच्या प्रश्नावर वडिलकीच्या नात्यातून लक्ष घालावे, अशी विनंती उदयनराजेंनी केली होती. तसेच, कोविड काळातही त्यांनी पवारांची भेट घेतली होती. पण, पक्षांतरामुळे दोघांमध्ये दुरावा आलेला होताच. पण, कऱ्हाडला बाळासाहेब पाटलांच्या मुलाच्या लग्नात मात्र तो दुरावा कमी झाल्याचे दिसून आले, कारण उदयनराजेंनी पवारांचे खास स्वागत केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT