Ram Satpute-Uttam Jankar  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Jankar Vs Satpute : इतका नालायक, हरामखोर, बदमाश माणूस सोलापुरात सापडत नव्हता; म्हणून त्याला बीडमधून आणलं : जानकरांचा सातपुतेंवर हल्ला

Sangli Morcha uttam Jankar Speech : सांगलीत गोपीचंद पडळकर यांच्या विधानाविरोधात काढलेल्या मोर्चात आमदार उत्तम जानकर यांची गाडी माजी आमदार राम सातपुते यांच्यावर घसरली. त्यांनी सातपुते यांच्यावर तीव्र शब्दांत हल्ला चढवला.

Vijaykumar Dudhale

सांगलीतील निषेध मोर्चात आमदार उत्तम जानकर यांनी माजी आमदार राम सातपुते यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांच्याबद्दल अत्यंत कठोर आणि कडवट शब्दांचा वापर केला.

जानकर यांनी सातपुते यांच्यावर गांजाच्या टेंपोला मुख्यमंत्री फडणवीस यांच्या फोनवरून सोडवून घेतल्याचा आणि पोलिसांकडे आर्थिक मागण्या केल्याचा गंभीर आरोप केला.

त्यांनी सातपुते यांचा सोलापूरमध्ये अटलबिहारी वाजपेयी यांना मानणाऱ्या भाजप नेत्यांनीही विरोध केला होता, असे सांगितले.

Sangli, 22 September : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान करणारे भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात सांगलीत निषेध मोर्चा काढण्यात आला. त्या मोर्चात बोलताना माळशिरसचे आमदार उत्तम जानकर यांची गाडी माजी आमदार राम सातपुते यांच्यावर घसरली. जानकर यांनी सातपुते यांच्यावर अत्यंत कडवट शब्दांत हल्लाबोल केला.

आमदार जानकर म्हणाले, सांगली जिल्ह्यात सध्या गलिच्छ विचारांचं थैमान मांडलं आहे. तसा राज्यातील संपूर्ण जिल्ह्यांत त्यांचा प्रत्येकी एक माणूस आहे. आमच्याही सोलापूर जिल्ह्यात त्यांना अशा विचारांचा, इतका नालायक, बदमाश, हरामखोर माणूस सापडत नव्हता, म्हणून त्याला बीडमधून आणला. त्याचं नाव राम सातपुते (Ram Satpute) आहे, त्याने जिल्ह्यात हैदोस घातलेला आहे.

सोलापूर जिल्ह्यात अटलबिहारी वाजपेयी यांना मानणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या सर्व नेत्यांनी एकत्र येऊन बेईमान राम सातपुते यांच्या विरोधात मोर्चा काढला होता. विशाखपट्टणमहून आलेला एक टेंपो पंढरपूर पास करून माळशिरस तालुक्याच्या हद्दीत आला. पंढरपूर पोलिसांच्या पथकाने तो टेंपो माळशिरस हद्दीत पकडला, असे उत्तम जानकर (Uttam Jankar) यांनी नमूद केले.

ते म्हणाले, त्या टेंपेात साधारणपणे १० कोटी रुपयांचा गांजा होता. ज्यांनी पाठलाग करून गांजा पकडला होता, त्या पोलिसांना तो गांज्याचा टेंपो सोडून द्यावा लागला होता. कारण, राम सातपुते यांनी तेथून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन लावला. देवाभाऊ असं असं झालं आहे, आता तिकडून कोण बोलतं कळायला मार्ग नाही. एका सेकंदात तो टेंपो सोडून द्यावा लागला. ज्या पोलिसांनी तो पकडला होता, त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.

कारवाई झालेले पोलिस माजी आमदार राम सातपुते यांच्याकडे गेले, तेव्हा त्यांच्याकडे प्रत्येकी पाच-पाच लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती. म्हणजे हे सर्व महाराष्ट्रात ठरवून घडवलं जात आहे, असा आरोप ही जानकर यांनी केला.

आमदार जानकर म्हणाले, परवा त्यांनी मारकवाडीच्या सरपंचाला प्रदेश कार्यालयात नेलं होतं. त्या ठिकाणी त्यांनी मुलाखत दिली. सरपंच ९१ टक्के मत घेऊन निवडून आला आहे, असं हा दिवटा त्या पत्रकार परिषदेत सांगत होता. मला त्याला सांगायचं की, मारकवाडी आणि जतमधील निवडणुकीचं मतदान एकदा बॅलेट पेपरवर होऊन जाऊ दे.

  1. प्र: आमदार उत्तम जानकर यांनी कोणावर कठोर टीका केली?
    उ: माजी आमदार राम सातपुते यांच्यावर.

  2. प्र: गांजाच्या टेंपो प्रकरणाबाबत जानकर यांनी काय आरोप केला?
    उ: सातपुते यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना फोन करून टेंपो सोडवून घेतला आणि पोलिसांकडून पैसे मागितल्याचा आरोप केला.

  3. प्र: निषेध मोर्चा का काढण्यात आला होता?
    उ: भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या आक्षेपार्ह विधानाच्या निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात आला.

  4. प्र: मारकवाडी निवडणुकीसंदर्भात जानकरांनी काय आव्हान दिले?
    उ: मतदान बॅलेट पेपरवर घेऊन पाहावे, अशी टीका आणि आव्हान त्यांनी व्यक्त केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT