Jaykumar Gore-Shahajibapu Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Shahajibapu Patil : मोहिते पाटलांना अंगावर घेणाऱ्या शहाजीबापूंचा भाजपने ‘गेम’ का केला? राजकीय चर्चांना उधाण

Sangola Political News : पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी ‘मी मदत केली म्हणून बाबासाहेब देशमुख आमदार झाले,’ या विधानाने सोलापूर राजकारणात खळबळ उडवली. भाजपच्या या ‘गेम’वर चर्चा रंगली आहे.

Vijaykumar Dudhale
  1. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या विधानामुळे सांगोला तालुक्यात राजकीय खळबळ उडाली, त्यांनी म्हटले – “मी मदत केली; म्हणून डॉ. बाबासाहेब देशमुख आमदार झाले.”

  2. या वक्तव्यानंतर भाजप व शेकापमधील संबंधांबाबत आणि निवडणुकीतील मदतीबाबत चर्चेला उधाण आले, तर माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या नाराजीची शक्यताही व्यक्त होत आहे.

  3. शहाजीबापू पाटील यांनी मात्र सौम्य भूमिका घेत म्हणाले – “भावनेच्या भरात मंत्री बोलले, पण मी भाजपला दोष देणार नाही; पुढील निवडणुकीत शिवसेनेचा उमेदवारच आमदार होईल.”

Solapur, 12 October : ‘मी मदत केली; म्हणून डॉ. बाबासाहेब देशमुख आमदार झाले,’ असे विधान करून पालकमंत्री तथा भाजप नेते जयकुमार गोरे यांनी एकच खळबळ उडवून दिली. मात्र, लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासाठी माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी बलाढ्य मोहिते पाटील यांना अंगावर घेतले होते. त्याच शहाजीबापूंचा मित्रपक्ष भाजपने गेम का केला, अशी चर्चा सोलापूरच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.

सांगोल्यातील शेतकरी कामगार पक्षाच्या काही प्रमुख कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्या कार्यक्रमादरम्यान पालकमंत्री गोरे यांनी ‘मी मदत केली; म्हणून डॉ. बाबासाहेब देशमुख आमदार झाले,’ असे विधान केले. त्यामुळे पालकमंत्री गोरे यांनी शेकापचे आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख (Dr. Babasaheb Deshmukh) यांना निवडणुकीत कोणत्या प्रकारची मदत केली, असा सवाल उपस्थित होत आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत शहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil) यांनी भाजप उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावली होती. याशिवाय मोहिते पाटील यांच्यावर टीका करताना त्यांची जीभ घसरली होती. त्यांच्या तोंडी मोहिते पाटलांचा ऐकरी उल्लेख आणि शिवराळ भाषा होती. त्याची चर्चाही त्यावेळी जिल्ह्यात रंगली होती.

पाण्याच्या मुद्यावरून शहाजीबापू यांनी थेट माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्यावर निशाणा साधला होता. सांगोल्यातून भाजप उमेदवाराला चांगली मते मिळाली होती. त्यानंतरही विधानसभा निवडणुकीत अशी काय गणितं फिरली की भाजपकडून थेट शहाजीबापूंचा कार्यक्रम झाला, असा सवाल शहाजी पाटील यांच्या समर्थकांकडून विचारला जात आहे.

विधानसभा निवडणुकीत जयकुमार गोरे यांनी आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांना कशा प्रकारे मदत केली असावी, याची चर्चा रंगली आहे. मात्र त्यावेळी ओबीसी फॅक्टरची सांगोल्यात जोरदार चर्चा रंगली होती. कारण लोकसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टर जोरात चालला होता, त्यामुळे विधानसभेत ओबीसी फॅक्टर चालला का, असा सवाल विचारला जात आहे.

शहाजीबापू म्हणतात ‘मी भाजपला दोष देणार नाही’

जयकुमार गोरे यांच्या विधानावर माजी आमदार शहाजीबापू पाटील म्हणाले, ‘भावनेच्या भरात पालकमंत्री बोलले असले तरी मी भाजपमुळे पराभूत झालो, असे म्हणणार नाही. विधानसभेच्या 2029 च्या निवडणुकीत शिवसेनेचा उमेदवार निश्चितपणे आमदार होईल. आमचे पक्षप्रमुख एकनाथ शिंदे जो उमेदवार देतील, तो सांगोल्यातून विजयी होणार, हे निश्चित आहे.

प्रश्न 1 : जयकुमार गोरे यांनी कोणते विधान केले?
“मी मदत केली; म्हणून डॉ. बाबासाहेब देशमुख आमदार झाले.”

प्रश्न 2 : या विधानानंतर काय प्रतिक्रिया उमटल्या?
भाजप आणि शेकापमधील संबंधांवर चर्चा रंगली व गोरे यांनी नेमकी कोणती मदत केली याबाबत प्रश्न उपस्थित झाले.

प्रश्न 3 : माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी काय प्रतिक्रिया दिली?
“मी भाजपला दोष देणार नाही, भावनेच्या भरात मंत्री बोलले,” अशी संयमी भूमिका घेतली.

प्रश्न 4 : शहाजीबापू पाटील यांनी पुढील निवडणुकीबाबत काय भाकीत केले?
2029 च्या निवडणुकीत शिवसेनेचा उमेदवार निश्चितपणे विजयी होईल, असे त्यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT