Raksha Khadse Help News Maharashtra Sarkarnama
महाराष्ट्र

Raksha Khadse News : रक्षा खडसेंचा एक फोन अन् साता समुद्रापार असलेली चिमुकली नात आजारी आजीला भेटू शकली!

Union Minister Raksha Khadse intervenes to resolve a visa issue, enabling a granddaughter to travel to India and meet her ailing grandmother. : कुटुंबाने 18 जुलै ची विमानाची तिकिटे काढली होती. पण अचानक त्यांच्या लक्षात आहे की दोन वर्षाच्या रूहीच्या व्हिसाची मुदत संपलेली आहे. त्यांनी व्हिसासाठी अर्ज केला पण त्यासाठी 72 तास लागणार होते.

Jagdish Pansare

तुषार पाटील

BJP News : अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या एका दांपत्याला पुण्यात आजारी असलेल्या आपल्या नातेवाईकाला भेटायला यायचे होते. विमानाची तिकीटं काढली, पण दोन वर्षा चिमुकलीचा व्हिसा नसल्याने मोठी अडचण निर्माण झाली. मुलीशिवाय जाणे शक्य नव्हते, विमान उडाणाला अवघे काही तास शिल्लक होते. दांपत्याने फोनाफोनी करून मार्ग काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले. भारतालील नातेवाईकांशी संपर्क साधला अन् केंद्रीय क्रिडा राज्यमंत्री रक्षा खडसे मदतीला धावून आल्या.

दिल्लीतील यंत्रणा आणि अमेरिकेतली दुतावासाशी संपर्क साधत काही तासातच रक्षा खडसे यांनी चिमुकलीला व्हिसा मिळवून दिला. काही तासांनी हे दांपत्य अमेरिकेतून भारतात येण्यासाठी विमानात बसले. आजारी आजीची आणि नातीची भेट होणार याचा आनंद या कुटुंबाच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. मंत्री रक्षा खडसे (Raksha Khadse) यांनी दाखवलेली तत्परता आणि केलली मदत या बद्दल संबंधित कुटुंबाने त्यांचे आभार मानले आहेत.

राजकीय नेते , मंत्री हे अनेकदा अडचणीत असलेल्या कार्यकर्त्यांसाठी फोनद्वारे किंवा प्रत्यक्ष, अप्रत्यक्षरित्या मदतीला धावून जात असतात. त्याच्या या मदतीने अनेकांच्या समस्या सुटतात, त्यांना तातडीची मदत उपलब्ध होते आणि मग त्या नेत्याबद्दल त्यांचा आदरही वाढतो. (BJP) केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांची अशी मोलाची मदत अमेरिकेतील एका मराठी कुटुंबाला झाली. साता समुद्रपार असलेल्या दोन वर्षाच्या चिमुकलीची पुणे येथील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार घेत असलेल्या आजारी आजीशी भेट झाली.

छत्रपती संभाजीनगर येथील प्रसिद्ध दंतरोग तज्ञ डॉ. श्याम महाजन यांचा धाकटा मुलगा कुणाल नोकरी निमित्त अमेरिकेत स्थायिक आहे. सून नेहा यांची आई दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार घेत असल्यामुळे मुलगी ,नातू नीर, दोन वर्षाची नात रूही यांना तातडीने आजीच्या भेटीसाठी भारतात यायचे होते . कुटुंबाने 18 जुलै ची विमानाची तिकिटे काढली होती. पण अचानक त्यांच्या लक्षात आहे की दोन वर्षाच्या रूहीच्या व्हिसाची मुदत संपलेली आहे. त्यांनी व्हिसासाठी अर्ज केला पण त्यासाठी 72 तास लागणार होते.

एक दिवस उलटून गेल्यानंतरही व्हिसा संदर्भात दुतावासाकडून काहीच कळवण्यात आले नव्हते. ही अडचण त्यांनी भारतातील आपल्या नातलगांना सांगितली. त्यांनी मदतीसाठी केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्याशी शुक्रवारी संपर्क साधून मदत मागितली. रक्षा खडसे यांनी तातडीने सुत्रं हलवली आणि यंत्रणा कामाला लावली. अगदी दहा मिनिटात त्यांचे वैयक्तिक सचिव अतुल महाजन यांनी डॉ.महाजन यांना संपर्क करून पासपोर्ट, व्हिसा, बर्थ सर्टिफिकेट, फ्लाईट डिटेल्सची माहिती मागवून घेतली.

सदरील कागदपत्रे तपासून आवश्यक गोष्टींची पूर्तता करून घेतल्यानंतर रक्षा खडसे यांनी स्वतः या प्रकरणात लक्ष घालून परराष्ट्र मंत्रालय, भारतीय दूतावास व गृह मंत्रालय यांच्याकडे पाठपुरावा केला. त्यानंतर दोन वर्षाच्या रूहीला व्हिसा मिळाला. या संपूर्ण प्रक्रियेत भारत व अमेरिका यांच्यातील दिवस रात्रीच्या वेळेच्या फरकामुळे अडचणी आल्या. पण अखेर या सगळ्या अडचणींवर मात करत व्हिसा मिळवण्यात यश आले. रक्षा खडसे एवढ्यावर थांबल्या नाहीत, तर त्यांनी महाजन कुटुंब विमानात बसेपर्यंत पाठपुरावा केला. महाजन कुटुंबीय सियाटेल शहरातून 18 जुलैला भारतात येण्यासाठी रवाना झाले.

पॅरिसमध्ये रोखले..

दरम्यान, पॅरिस विमानतळावर मुलगा नीर याच्या पासपोर्ट, व्हिसामध्ये तांत्रिक अडचणीचे कारण सांगून एअरलाइन व सुरक्षा यंत्रणांनी कुटुंबाला थांबवून ठेवले. दोन तास विमान पॅरिस विमानतळावर थांबवण्यात आले होते. फ्रेंच कर्मचारी कुठल्याही भारतीय व्यक्तीशी याबाबत बोलण्यास तयार नव्हते. कुणाल महाजन यांचा भारतीय दुतावासाशी किंवा येथील अधिकाऱ्यांशी संपर्क होत नव्हता. अशा परिस्थितीत पुन्हा रक्षा खडसे मदतीला धावून आल्या. त्यांनी पर्यायी एअर इंडियाच्या विमानाने मुलांना भारतात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले.

अखेर एअर फ्रान्सने रविवारी पहाटे हे कुटुंब भारतात आले आणि सकाळी आठ वाजता या कुटुंबांची आजारी आजीशी भेट झाली. परदेशातील फ्रेंच अधिकारी व विमानाचे कर्मचारी यांनी पॅरिस विमानतळावर अत्यंत उर्मट वागणूक देत त्रास दिल्याचा अनुभव त्यांनी सांगितला. तर मुंबई विमानतळावर भारतीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कुटुंबीयांना धीर देत मदत केल्याचे त्यांनी सांगितले. भारतात दाखल झालेल्या महाजन कुटुंबाशी रक्षा खडसे यांनी संवाद साधला. छत्रपती संभाजीनगर येथे चिमुकल्या रूहीला भेटण्याचे आश्वासनही दिले. मुंबई एअरपोर्टवर कुटुंबाला सुरक्षा संदर्भात अडचण येऊ नये म्हणून सचिव महाजन पहाटे या कुटुंबाच्या संपर्कात होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT