Mumbai News : राज्यातील विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन पार पडले. मात्र, हे अधिवेशन सभागृहाबाहेरील विविध कारनाम्यानी गाजले. गेल्या काही दिवसापासून बेताल वक्तव्य करणाऱ्या नेतेमंडळीमुळे सत्ताधारी महायुती अडचणीत आली आहे. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री, भाजपचे मंत्री यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याने ऐन अधिवेशनकाळात अडचणीत भर पडली आहे. त्यातच भाजपचे मंत्री गोपीचंद पडळकर आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यात विधानसभेच्या गॅलरीत हाणामारी झाली.
विधिमंडळाच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रकार घडल्याने मोठी नाचक्की झाली आहे. त्यामुळे सर्वच नेत्यांची या कृत्यामुळे बदनामी झाली आहे. विशेषतः भाजपची प्रतिमा शिस्तबद्ध पक्षच अशी राहिली आहे. त्यामुळेच बेताल वक्तव्य करणाऱ्या नितेश राणे, गोपीचंद पडळकरांना भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी समज दिली आहे. त्यामुळे थेट प्रदेशाध्यक्षांनीच कान टोचल्यानंतर भाजपमधील या वाचळवीरांना चाप बसणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पावसाळी अधिवेशनात कामकाज पार पडले असले तरी महत्वाच्या मुद्द्यावर चर्चा झाली नाही. तर दुसरीकडे या अधिवेशनात सभागृहाबाहेरील विविध मुद्देच चर्चेत आले. विशेषतः महायुतीमधील मंत्री काही कारणाने चर्चेत आले आहेत.
दुसरीकडे प्रदेशाध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर रवींद्र चव्हाण यांनी भाजपमधील बेताल वक्तव्य करणाऱ्या नेत्यांना समज दिली आहे. लोकप्रतिनिधींनी बोलताना जपून शब्द वापरले पाहिजेत. टीआरपीच्या शर्यतीत नेत्यांनी अडकू नये अशी तंबीच त्यांनी दिली आहे.
सत्ताधारी पक्षातल्या अनेक नेत्यांच्या वक्तव्यांमुळे वादंग निर्माण झाला आहे. काही दिवसांपूर्वी जाहीर सभेत बोलताना भाजप नेते गोपीचंद पडळकरांची जीभ घसरली होती. मंत्री नितेश राणे आणि गोपीचंद पडळकर हे कायम आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत राहतात. त्यामुळेच भाजपमधल्या या वादग्रस्त नेत्यांना नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना समज दिली आहे.
पडळकरांनी पवार कुटुंबाबाबत बोलताना वादग्रस्त वक्तव्य केले होते. भाजप नेते आणि मंत्री नितेश राणेही कायमच वादाच्या केंद्रस्थानी असतात. नितेश राणेंच्या अनेक वक्तव्यांनी आतापर्यंत वाद झालेले आहेत. राणेंच्या वक्तव्यानंतर भाजपचीही अनेकदा अडचण झाली आहे. अशा वाचाळवीर नेत्यांमुळे भाजपची अडचण झाल्याचीच कबुली अप्रत्यक्षपणे रवींद्र चव्हाण यांनी दिली आहे.
या वादग्रस्त वक्तव्याने भाजपची प्रतिमा मालिन होत आहे. त्यामुळेच वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या या दोन नेत्यांना चव्हाण यांनी समज दिली आहे. त्यामुळे थेट प्रदेशाध्यक्षांनीच कान टोचले आहेत. त्यामुळे येत्या काळात भाजपमधील या वाचळवीरांना चाप बसणार का, याकडे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.