Sanjay-Raut Sarkarnama
महाराष्ट्र

MVA government secrets : ...तर आघाडी सरकारमध्ये कोल्हापूरचा 'हा' रांगडा गडी गृहमंत्री झाला असता'; संजय राऊतांचा गौप्यस्फोट

Sanjay Raut revelations News : बहुमत असताना देखील भाजपला विरोधी बाकावर बसावे लागले होते. त्यावेळी अचानक आलेल्या या महाविकास आघाडी सरकारमध्ये उद्धव ठाकरे यांनी इच्छा नसताना सर्व जणांच्या आग्रहाखातर मुख्यमंत्री पद स्वीकारले होते.

सरकारनामा ब्युरो

Mumbai News : राज्यात 2019 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीला स्पष्ट बहुमत मिळाले होते. त्यानंतर भाजप-शिवसेना युतीचे सरकार सत्तेवर येणार अशी चर्चा सुरु झाली होती. मात्र, त्यावेळी ज्येष्ठ नेते शरद पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पुढाकाराने राज्यात महाविकास आघाडीचा उदय झाला. सत्ता समीकरण जुळवताना त्यावेळी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे तीन पक्ष एकत्र आले होते. तर बहुमत असताना देखील भाजपला विरोधी बाकावर बसावे लागले होते. त्यावेळी अचानक आलेल्या या महाविकास आघाडी सरकारमध्ये उद्धव ठाकरे यांनी इच्छा नसताना सर्व जणांच्या आग्रहाखातर मुख्यमंत्री पद स्वीकारले होते.

त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसकडून (NCP) राज्याच्या गृहमंत्री पदासाठी त्यावेळी अनेक नावावर चर्चा झाली होती. त्यावेळी कोल्हापूरचा 'हा' रांगडा गडी देखील गृहमंत्री झाला असता असा गौप्यस्फोट ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या शंभर दिवसांच्या तुरुंगवासात लिहिलेल्या "नरकातला स्वर्ग" या पुस्तकामध्ये केला आहे.

खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी तब्बल 100 दिवस तुरुंगवासात होते. यावेळी राऊत यांनी या शंभर दिवसात "नरकातला स्वर्ग" हे पुस्तक लिहिले. त्यांनी "नरकातला स्वर्ग" या पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन केले आहे. यामध्ये त्यांच्या शंभर दिवसातील प्रवास आणि महाविकास आघाडी आणि भाजप तसेच अनेक नेत्यांबद्दल या पुस्तकात अनेक गौप्यस्फोट केले आहेत.

राज्यात २०१९ साली महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होताना, राज्याचा गृहमंत्री कोण असावा या संदर्भात अनेक नावांची चर्चा झाली. यामध्ये कोल्हापूरचा रांगडा व तगडा गडी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ हेच योग्य होते. मात्र ते अल्पसंख्यांक असल्याने त्यांना मोठ्या प्रमाणात लक्ष्य करण्याची भीती शरद पवार यांना होती. यामुळे त्यावेळी मुश्रीफ गृहमंत्री होऊ शकले नाहीत, असे राऊतांनी पुस्तकात म्हटले आहे.

राऊत यांनी त्यांच्या पुस्तकाच्या पान नंबर १०२ वर लिहिले आहे. महाविकास आघाडी सरकारचे बाळंतपण साधे नव्हते. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यावर गृहखाते कोणाकडे जाणार यावर पैजादेखील लागल्या होत्या. छगन भुजबळ हे ज्येष्ठ नेते होते, त्यांना गृहमंत्री व्हायची प्रबळ इच्छा होती. त्यांच्यात हे खातं सांभाळण्याची क्षमताही होती. मात्र त्यांचा तुरुंग प्रवास अडचण ठरला असावा, असा गौप्यस्फोट राऊतांनी या पुस्तकात केला आहे.

त्याच वेळी अजित पवार हे देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पहाटेचा शपथविधी उरकून रिकाम्या हाताने पुन्हा स्वगृही आले होते. त्यामुळे या पदासाठी त्यांचा विचार होईल, असे मला वाटत नव्हते. जयंत पाटील यांनी गृहमंत्री पदाची जबाबदारी घेण्यास नकार दर्शवला होता. तर वळसे पाटील यांच्या प्रकृतीच्या कुरबुरी होत्या. या सर्वात "कोल्हापूरचा रांगडा आणि तगडा गडी हसन मुश्रीफ एक उत्तम चॉईस ठरले असते. परंतु ते अल्पसंख्यांक असल्याने प्रत्येक गोष्टीत त्यांना टार्गेट केले जाईल, अशी भीती शरद पवारांना वाटत होती.

हसन मुश्रीफ हे कमालीचे पुरोगामी नेते आहेत. पक्के निधर्मी आणि दिलखुलास व्यक्तिमत्त्व आहेत. शाहू महाराजांवर अपार श्रद्धा असलेले ते कार्यकर्ते आहेत. पण शेवटी धर्म आडवा आला, असा गौप्यस्फ़ोट संजय राऊत यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT