Ajit Pawar - Sharad Pawar Sarkarnama
महाराष्ट्र

Sharad Pawar : "कुटुंबातील सर्वजण माझ्याविरोधात", अजित पवारांच्या विधानावर शरद पवार प्रत्युत्तर देत म्हणाले...

Sharad Pawar : "राष्ट्रवादी पक्षाची स्थापना कुणी केली, हे सगळ्या देशाला माहिती आहे. तरीसुद्धा...", असंही शरद पवारांनी म्हटलं.

Akshay Sabale

काही जण भावनिक आवाहन करण्याचा प्रयत्न करतील. भावनिक होऊन कामे होत नाहीत. आम्ही उभा करेल, त्या खासदाराला विजयी केलं पाहिजे, तर मी विधानसभेला उभे राहणार. मला साथ दिली नाही, तर प्रपंच आणि उद्योगधंदे पडले आहेत, असं विधान उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar ) यांनी बारामतीत केलं होतं. याला राष्ट्रवादी काँग्रेसचे ( शरदचंद्र पवार ) अध्यक्ष शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. "आम्हाला भावनिक आवाहन करण्याची आवश्यकता वाटत नाही," असं शरद पवारांनी म्हटलं आहे. ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते. ( Sharad Pawar Reply Ajit Pawar Latest News )

शरद पवार ( Sharad Pawar ) म्हणाले, "आमच्याकडून भावनिक आवाहन करण्यात येणार नाही. त्याचं कारण बारामती मतदारसंघातील लोक वर्षानुवर्षे आम्हाला ओळखतात. त्यामुळे भावनिक आवाहन करण्याची आम्हाला आवश्यकता वाटत नाही, पण विरोधकांकडून करण्यात येणाऱ्या भाषणाची पद्धत काहीतरी वेगळं सुचवते. त्याची नोंद बारामतीतील सामंजस्य मतदार घेतील."

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

'कुटुंबातील सर्वजण माझ्याविरोधात गेले आहेत,' असं वक्तव्यही अजित पवारांनी केलं होतं. याकडे शरद पवारांचं लक्ष वेधलं असता, त्यांनी म्हटलं, "निवडणुकीत मतदारांची साथ मागण्याचा अधिकार उमेदवाराला आहे. पण, कुटुंबातील सगळे लोक एका बाजूला आणि मीच एकटा सांगणं, याचा अर्थ भावनात्मक भूमिका मांडून जनतेची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न दिसतोय."

"राष्ट्रवादी पक्षाची स्थापना कुणी केली, हे सगळ्या देशाला माहिती आहे. तरीसुद्धा पक्ष दुसऱ्यांना देणं हा अन्याय आहे. आयोगाचा निर्णय अन्यायकारक आहे. विधानसभा अध्यक्ष वेगळा निर्णय देणार नाही, याची खात्री होती. शिवसेनेबरोबरही त्यांनी असाच निर्णय घेतला. आता आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाण्याची तयारी केली आहे," असं शरद पवारांनी सांगितलं.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT