Milind Deora : काँग्रेस सोडण्यामागं नेमकं कारण काय? मिलिंद देवरा म्हणाले, "तो एक..."

Milind Deora On Eknath Shinde : देवरांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं कौतुक केलं आहे.
Milind Deora
Milind Deorasarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : कोल्हापूर येथे शिवसेनेचं ( शिंदे गट ) अधिवेशन पार पडत आहे. या अधिवेशनात मिलिंद देवरा ( Milind Deora ) सुद्धा सहभागी झाले आहेत. या वेळी देवरांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं कौतुक केलं आहे, तर काँग्रेस सोडण्याचं कारण सांगताना, "तो एक मोठा विषय आहे. त्यावर मला एक पुस्तक लिहावं लागेल," असं म्हणत देवरांनी अधिक बोलणं टाळलं. ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

Milind Deora
Loksabha Election 2024 : 'छोट्या पहिलवानाने अस्मान दाखवलं,' धैर्यशील मानेंनी राजू शेट्टींना डिवचलं

काँग्रेसमध्ये अशी कोणती गोष्ट खटकली की दिग्गज नेते बाहेर पडू लागले आहेत. या प्रश्नावर देवरा म्हणाले, "आता इतिहासात काय घडले याचा आम्ही विचार करत बसणार नाही. आम्हाला भविष्याचा विचार महत्त्वाचा आहे. आगामी काळात आम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करायचे आहेत. त्यांच्याकडे देश प्रगतीवर नेण्याची दूरदृष्टी आहे."

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अधिवेशनातून काय शिकायला मिळाले? यावर देवरांनी म्हटलं, "शिवसेनेत एका कुटुंबासारखं वातावरण आहे. सध्या देशात भाजप आणि राज्यात एकनाथ शिंदेंची शिवसेना हे दोनच पक्ष लोकतांत्रिक आहेत. काँग्रेस सोडताना मी भावूक झालो होतो, पण आता शिवसेनेच्या अधिवेशनात आल्यानंतर मला आनंद होत आहे."

Milind Deora
Shiv Sena Convention : 'गुलाबराव पाटलांनी राऊतांची पाकच काढली...

"मी कधी काँग्रेस पक्ष सोडेन, असे मला वाटले नव्हते. मात्र, मुख्यमंत्र्यांनी मला राज्यसभेची उमेदवारी दिली आहे. आगामी काळात मुख्यमंत्री शिंदेंची दूरदृष्टी संपूर्ण महाराष्ट्र आणि मुंबईत चांगल्या प्रकारे पोहाेचवण्याचे काम करणार आहे," असं देवरांनी सांगितलं.

Milind Deora
Shivsena Mahaadhiveshan : ...तर उद्धव ठाकरेंनी माझ्या घरची भांडी घासावीत; रामदास कदमांचा घणाघात

काँग्रेस सोडण्याचं नेमकं कारण काय? या प्रश्नावर देवरा म्हणाले, "हा मोठा विषय आहे. त्यावर मला एक पुस्तक लिहावे लागेल." काँग्रेसची आणखी काही मंडळी बाहेर पडणार का, यावर त्यांनी अधिक बोलणं टाळलं.

( Edited By : Akshay Sabale )

R

Milind Deora
Shivsena News : मागच्या वेळी केवळ 'मन की बात' होती...असे का म्हणाले किशोर पाटील

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com