Eknath Shinde Operation Tiger 3 Begins Sarkarnama
महाराष्ट्र

Union Cabinet Expansion: दिल्लीत शिंदेंचा मोठा गेम प्लॅन! शिवसेनेच्या कोट्यातील 2 मंत्रीपदांसाठी 'हे' 5 दिग्गज शर्यतीत; सस्पेन्स वाढला, कोणाला मिळणार संधी?

Shinde Sena Cabinet Expansion News : संसदेचे हिवाळी अधिवेशन 20 जुलैला होणार असून त्यापूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे.

Sachin Waghmare

Mumbai News : उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या सहा खासदारांनी दहा दिवसापूर्वी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे दिल्ली दरबारी बळ वाढले आहे. त्यांच्याकडे 7 खासदार असताना केंद्रात एक मंत्रिपद मिळाले होते. त्यातच आता 6 खासदार आल्याने त्यांचे संख्याबळ 13 झाले आहे. त्यामुळे त्यांना दोन मंत्रीपदे मिळण्याची शक्यता आहे. त्यामध्ये एक कॅबिनेट तर एक राज्यमंत्रिपद मिळणार आहे. त्यातच आता या 2 मंत्रीपदांसाठी 5 दिग्गज नेते शर्यतीत असल्याने एकनाथ शिंदे कोणाला संधी देणार? यावरून आता धाकधूक वाढली आहे.

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत मोठी फूट पडली. 6 खासदारांनी पक्षातून बंडखोरी करीत एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला. संसदेचे हिवाळी अधिवेशन 20 जुलैला होणार असून त्यापूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. त्यातच दोन दिवसापूर्वीच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांची बैठक पार पडली. यामध्ये येत्या काळात होत असलेल्या विस्ताराबाबत विस्तृतपणे चर्चा करण्यात आली. त्यामुळे आगामी काळात विधानसभा होत असलेल्या राज्यांना विस्त्रात संधी दिली जाणार आहे. त्यासोबतच काही दिवसापूर्वी फुटलेल्या आप, शिवसेना खासदारांना विस्तारात संधी दिली जाणार आहे.

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या दोन खासदारांना केंद्रात मंत्रिपद मिळणार आहेत. त्यापैकी कॅबिनेट मंत्रिपदासाठी डॉ. श्रीकांत शिंदे (Shrikanth shinde) यांचे नाव फायनल मानले जात होते. मात्र खासदार श्रीरंग बारणे यांच्या नावाची चर्चा आता सुरू झाली आहे. श्रीरंग बारणे आणि श्रीकांत शिंदे यांच्यापैकी एकाला मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे कदाचित या दोघापैकी एकाला सुरुवातीचे दीडवर्ष व नंतरचे दीड वर्ष दुसऱ्याला असा फॉर्म्युला कदाचित असू शकतो. याबाबत अंतिम निर्णय एकनाथ शिंदे घेणार आहेत त्यामुळे त्यांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

केंद्रीय राज्यमंत्रिपदासाठी नुकतीच ठाकरेंच्या शिवसेनेतून (Shivsena) आलेल्या परभणीचे खासदार संजय जाधव आणि धाराशिवचे खासदार ओम राजेनिंबाळकर यांची मंत्रिपदी वर्णी लागणार असल्याची माहिती समोर येत आहे. या दोघांना तीन वर्षांपैकी दीड-दीड वर्ष वाटून दिले जाणार आहे. तर दुसरीकडे संजय दिना पाटील यांचे नाव देखील चर्चेत आले आहे. त्यामुळे त्यांना कशाप्रकारे संधी दिली जाणार याकडे लक्ष लागले आहे. त्यामुळे या तीन पैकी एकाला संधी मिळणार आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळात कोणाला स्थान द्यायचे हे एकनाथ शिंदे ठरवतात. नेहमीच ते कार्यकर्त्याला न्याय देतात. दरम्यान, फुटलेले खासदार भाजपमध्येही प्रवेश करू शकत होते, मग त्यांना तुमच्याकडे का घेण्यात आले असा प्रश्नही त्यांना यावेळी विचारण्यात आला. जे सहा खासदार आहेत. ते मुळात बाळासाहेबांच्या विचाराने कार्य करत आहेत. ते पक्ष प्रमुखाला भेटू शकत नव्हते, त्यांच्या मतदारसंघात विकास कार्य होत नव्हते, म्हणून त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला, असेही यावेळी खासदार बारणे यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT